Monday, March 17, 2025
HomeमानिनीHealthHeart Attack Symptoms : महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी

Heart Attack Symptoms : महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी

Subscribe

लहानांपासून ते मोठ्यांपर्यत हल्ली कोणत्याही वयोगटात हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बैठी जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचे कारण ठरत आहे. याशिवाय हाय बल्ड प्रेशर, हाय लेवल कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची वाढती पातळी, स्मोकिंग, धुम्रपान, स्ट्रेस या कारणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अॅटॅकचे येण्याचे प्रमाण त्यातुलनेने कमी आहे. हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात. ही लक्षणे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी दिसतात. चला तर मग जाणून घेऊयात पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील हार्ट अॅटॅकची लक्षणे

महिलांमध्ये दिसतात ही लक्षणे –

  • आंबट ढेकर
  • स्ट्रेस आणि टेन्शन
  • मळमळ
  • अपचन
  • थकवा
  • चक्कर येणे
  • निद्रानाश
  • छातीच्या खालच्या भागात दुखणे

खरं तर, महिलांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा यासारख्या समस्या हार्ट अॅटॅकला कारण ठरत आहे. त्यामुळे तुम्हाला वरील कोणतेही लक्षण जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. याशिवाय हार्ट अॅटॅकचा धोका टाळण्यासाठी मानसिक तणाव, नैराश्य यापासून लांब राहायला हवे. तसेच काहीवेळा गर्भनिरोधक गोळ्या हार्ट अॅटॅकला कारण ठरत असल्याचे समोर आले आहे.

पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणे –

  • छातीत दुखणे
  • अस्वस्थता
  • श्वास घेण्यास अडचण
  • जास्त घाम येणे
  • छातीत जळजळ होणे
  • मळमळ
  • अपचन
  • पोटदुखी

हार्ट अॅटॅक आल्यावर सर्वप्रथम काय कराल –

  • जवळच्या व्यक्तीला किंवा तुम्हाला हार्ट अॅटॅकची कोणतीही लक्षणे दिसल्यास सर्वप्रथम रुग्णवाहिकेला कॉल करावा, जेणेकरुन वेळेत हॉस्पिटलला पोहोचाल आणि उपचार सुरू करावेत.
  • तुम्हाला हार्ट अॅटॅकची लक्षणे दिसत असल्या एकटे जाऊ नये. घरातील व्यक्ती किंवा शेजारील कोणालाही सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये जावे.
  • हार्ट अॅटॅक आल्यावर CPR देऊ शकता. CPR मध्ये छातीच्या मध्यभागी जलद गतीने दाब दिला जातो.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini