घरताज्या घडामोडीऑक्सिजनची कमतरता टाळण्यासाठी रोजच्या पौष्टिक आहारात काय गरजेचं ?

ऑक्सिजनची कमतरता टाळण्यासाठी रोजच्या पौष्टिक आहारात काय गरजेचं ?

Subscribe

शरीरातील ऑक्सिजन पातळी साधारणपणे ९५ ते १०० टक्के असणे गरजेचे

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रुग्ण ऑक्सिजनची वाट पाहत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नवीन लक्षणे समोर येत आहेत. त्यामुळे स्वत: ची अधिक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित असणेही गरजेचे आहे. कोरोनासारखा आजार असो किंवा इतर कोणताही आजार या आजारांशी दोन हात करण्यासाठी शरीरासोबतच मनाचे स्वास्थही तितकेच महत्वाचे आहे. कोरोनाचा परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करायला हवा. ज्यांना कोरोनाचा जास्त धोका नाही पण शरीरातील ऑक्सिजनची पातळी कशी वाढायची किंवा ऑक्सिजनची पातळी कशाप्रकारे संतुलित ठेवायला हवी, त्यासाठी आहारात कोणत्या पौष्टिक गोष्टींचा वापर करावा याविषयी जाणून घ्या.

ज्यांना कोरोना झाला आहे मात्र त्यांची परिस्थिती जास्त गंभीर नाही अशा रुग्णांना शरीरातील ऑक्सिजनती पातळी संतुलित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या रुग्णांना इतर रोगांशी लढण्यासाठी ऑक्सिजन पातळी योग्य असणे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार, एका निरोगी लहान मुलाच्या, किशोर वयातील मुलाच्या किंवा वृद्ध व्यक्तींच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी साधारणपणे ९५ ते १०० टक्के असणे गरजेचे असते.

- Advertisement -

ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून काय कराल?

शरीरात इतर गोष्टींप्रमाणे ऑक्सिजन पातळीही योग्य असणे गरजेचे आहे कारणऑक्सिजनच्या कमरतेमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवतो. त्याचप्रमाणे आपली रक्ताभिसरण क्रिया मंदावते. ब्रेन हॅमरेज व हार्ट अटॅकचा धोका संभावतो. ऑक्सिजनच्या कमतरेमुळे थायरॉईड असलेल्या रुग्णांचे हार्मोन संतुलन बिघडते. शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून शारीरिकरित्या हालचाल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे. आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश करणे गरजेचे आहे.

ऑक्सिजन वाढविण्यासाठी रोजच्या पौष्टिक आहारात काय गरजेचं ?

ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी कच्च्या किंवा पिकलेल्या केळ्यांचा आहारात समावेश करा. लिंबाचे सेवन केल्याने शरीराती व्हिटामिन्स सीची कमतरता दूर होते. लिंबू पाणी शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी मदत करते.  त्याचप्रमाणे रुग्णांनी पपईचे सेवन करणेही कधीही गरजेते. पपईमुळे रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढते. रोजच्या आहारात गाजर, बटाटे यांचाही समावेश करा त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये अल्कलाईन मोठ्या प्रमाणात असते ते शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करते.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्हाला दमा आहे ? कोरोना व्हायरसमुळे होताहेत हे गंभीर परिणाम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -