आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला तणावमुक्त राहायचे आहे. कामाच्या दैनंदिन ताणामुळे केवळ उत्पादकताच नाही तर लक्ष केंद्रित करणेही शक्य होत नाही. तणाव दूर करण्यासाठी मेडिटेशन करणे खूप फायदेशीर आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी मेडिटेशनपेक्षा सुंदर मार्ग इतर कोणताही असू शकत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओम मेडिटेशन विशेष फायद्याचे आहे.
- मेडिटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे, ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता आणि जागरुकता यांचा समावेश होतो.
- मेडिटेशनमुळे दिवसभर तुमच्यात सकारात्मक ऊर्जा राहील. तुमचे मन प्रसन्न राहील. जेणेकरून तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत.
- तज्ज्ञांच्या मते, ध्यान हे दोन वर्षांच्या वयापासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण करू शकतात. लहान मुलांनाही मेडिटेशनविषयी शिकवले पाहिजे.
- ध्यान करताना ओम हा शब्द वारंवार सांगू शकता. असे केल्याने तुम्ही ध्यानात गढून जाऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही रोज पाच ते दहा मिनिटे ध्यान करू शकता, तुम्ही 5 मिनिटं ध्यान सुरू करा. त्यानंतर, वेळ देखील वाढवू शकता.
मेडिटेशन करण्याची पद्धत :
सर्वात आधी तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी उठा. फ्रेश होऊन एखाद्या शांत ठिकाणी जावा. तुम्ही टेरेस किंवा बाल्कनीमध्येही बसू शकता. त्याठिकाणी एक चटई अंथरून बसून घ्या. अशावेळी तुम्ही पद्मासन किंवा सुखासनमध्ये बसू शकता. आता तुम्ही शांत बसून श्वासोच्छ्वास घ्या आणि सोडा. असे 3 वेळा केल्यानंतर ओम जप म्हणायला सुरुवात करा. हा जप तुम्ही 108 वेळा करू शकता. यामुळे एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल.