सरोगेसी म्हणजे काय? कोण असतात बायोलिजिकल पालक

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सरोगेसीमधून दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडकरांमधला सरोगेसी पँरेंट ट्रेंड चर्चेत आला आहे. पण सरोगेसी म्हणजे नेमके काय हे बऱ्याचजणांना माहित देखील नाही.

तर सरोगेसी म्हणजे कोणत्याही विवाहीत जोडप्याने मुलाला जन्म देण्यासाठी एखाद्या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेणे. साधारणत सरोगेसीमधून मुलं जन्माला घालण्यामागे अनेक कारणे असतात. यात प्रामुख्याने जोडप्याला स्वत:च मूल होत नसेल तर, गर्भारपणात महिलेच्या जीवाला धोका उद्धवणार असेल तर आणि जर मुलं जन्माला घालण्याची महिलेचीच इच्छा नसेल तर . या तीन मुख्य कारणांमध्ये जोडपे सरोगेसीतून मूल जन्माला घालण्याचा निर्णय देतात.

सरोगेसीमध्ये महिला स्वत:च्या किंवा डोनरच्या एग्जमुळे गर्भवती होते. त्या महिलेला सरोगेट मदर असे म्हणतात. तसेच गर्भधारणा होण्याआधी सरोगेट मदर आणि ज्यांना मूल हवे आहे ते जोडपे यांच्यात करार होतो. या करारानुसार सरोगेट मदरच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचे ते जोडपे कायदेशीर आईवडील असतात. गर्भवती सरोगेटचा प्रसूतीपर्यंत वैद्यकिय आणि देखभालीचा खर्च जोडपे करते.

दोन प्रकारच्या सरोगेसी
सरोगेसीचे दोन प्रकार असतात. यात पहील्या सरोगेसीला ट्रेडीशनल सरोगेसी असं म्हणतात. ज्यात मुलाच्या पित्याचे स्पर्म सरोगेसी करणाऱ्या महिलेच्या एग्जबरोबर जोडले जातात. यात मुलाचे बायोलिजकल संबंध फक्त त्या पुरुषाबरोबर असतात.

दुसरी सरोगेसी जेस्टेशनल असते. यात पित्याचे स्पर्म आणि आईचे एग्ज एका टेस्ट ट्यूबमध्ये ठेवले . नंतर ते सरोगेट मदरच्या गर्भाशयात सोडले जातात. यासाठी सरोगेट मदरला जोडपे योग्य ती किंमत देते. मूल जन्माला आल्यानंतर बाळ जोडप्याकडे सुपुर्द केले जाते.