फार पूर्वी पासूनच प्राचीन भारतामध्ये, मातीची भांडी अन्न शिजवण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरली जात होती. मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतात आणि शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. माती आणि दगडापासून बनवलेल्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे असल्याचा दावाही अनेक संशोधकांनी केला आहे.
मातीत असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला पोषक आहेत. तसेच मातीच्या अनेक गुणधर्मामुळे शरीरातील दाहकता कमी होते. तसेच मातीच्या भांड्यातील पाणी अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे.

हृदय healthy राहण्यासाठी असा करा मातीच्या भांड्याचा वापर-
- उच्च रक्तदाबाचा जर त्रास असेल तर मातीच्या भांड्यामुळे रक्तदाब कंट्रोल मध्ये राहतो.
- तसेच हृदयविकाराची समस्या उद्भवत नाही.
- मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी फारच कमी तेल वापरले जाते.
- यामध्ये स्वयंपाक करण्याची प्रक्रिया मंद आहे.
- त्यामुळे मातीच्या भांड्यात बनवलेल्या अन्नामध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.

- या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- शरीरात इन्सुलिनची पातळी मातीच्या भांड्यामुळे कमी होते.
- जर तुम्ही मधुमेहाने त्रस्त असाल तर मातीच्या भांड्यात बनवलेले अन्न तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
- यामध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने इन्सुलिनचे उत्पादन संतुलित राहते.
- याशिवाय पोषक तत्वांनी युक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
हेही वाचा :