घरCORONA UPDATEहे घ्या आता आलाय कोविड टोज! काय आहेत लक्षण आणि उपचार

हे घ्या आता आलाय कोविड टोज! काय आहेत लक्षण आणि उपचार

Subscribe

१३ वर्षांच्या एका मुलीला कोरोनाच्या या लक्षणांचा समाना करावा लागला

कोरोना व्हायरस वेळोवेळी आपली नवीन रुप दाखवत आहे. शरिरातील वेगवेगळ्या भागात कोरोनाचा परिणाम होत आहे.  श्वसनाच्या विकारापासून शरिरातील अनेक भागात कोरोनाने हल्ला केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र कोरोनाचा प्रभाव आता हात आणि पायांच्या बोटांवर देखील होत असल्याचे समोर आले आहे. या लक्षणांना कोविड टोज (Covid Toes)  असे म्हटले जात आहे. १३ वर्षांच्या एका मुलीला कोरोनाच्या या लक्षणांचा समाना करावा लागल्यानंतर त्यानंतर कोविड टोज हा आजार होत असल्याचे समोर आले. कोविड म्हणजे काय? कोविड डोजची लक्षणे काय? त्यावर कोणते उपाय करता येतात? याविषयीची अधिक माहिती जाणून घ्या. (What is the Covid Toes? What are the symptoms and treatment )

कोविड टोज म्हणजे काय?

पोडियाट्री कॉलेजच्या माहितीनुसार, काही कोरोना बाधित रुग्णांमध्ये हाता पायांच्या बोटांना सूज येणे, बोटे लाल होणे यासारखी समस्या दिसून आली आहे. यालाच कोविड टोज असे म्हटले जात आहे. संशोधनानुसार, हा आजार हाताच्या आणि पायांच्या बोटांना होऊ शकतो. यात हात पायांच्या बोटांना जखमा होण्याची देखील शक्यता आहे. या आजारात सुरुवातीला हाता पायांची बोटे लाल होतात व काही काळानंतर ती काळी निळी पडण्यास सुरुवात होते.

- Advertisement -

कोविड टोज मागचे कारण काय?

अभ्यासकांना आतापर्यंत कोविड टोज मागचे कोणतेही विशेष कारण समोर आलेले नाही. अभ्यासक यावर संशोधक करत आहेत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविड टोज हा कोरोना व्हायरसच्या परिणामांमुळे होत आहे. त्याचप्रमाणे घरात उघड्या पायांनी चालणे, शारिरीक हालचाल कमी असणे आणि गतिहीन जीवनशैली हे या मागचे कारण असू शकते.

कोविड टोजची लक्षणे

  • हाता पायांच्या बोटे लाल किंवा काळी निळी पडणे
  • बोटांमध्ये जखमा होणे
  • हाता पायांची त्वचा कोरडी पडणे

कोविड टोजचा आपल्य जिवाला काही धोका होत नसला तरी आपल्या हाता पायांच्या बोटांना त्यांचा भयंकर त्रास होऊ शकतो. पायांच्या बोटांना हानी झाल्यास चालणे चप्पल किंवा शुज घालणेही त्रासदायक होऊ शकते. कोविड टोज प्रकरणात अनेक जणांची बोटे आपोआप बरी होतात मात्र खूप काळ त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आधी Alpha नंतर Delta वेरिएंटचा संसर्ग,लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही ६१ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -