लिंबू बाराही महिने उपलब्ध असणारे फळ आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर स्वयंपाकात केला जातो. यात व्हिटॅमिन सी भरपुर प्रमाणात आढळते. सध्या उष्णता तीव्र असल्याने डिहाड्रेशन, अशक्तपणासारख्या समस्या वारंवार जाणवतात. अशावेळी तुम्हाला लिंबू रामबाण उपाय आहे. लिंबूच्या सेवनाने अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. त्यामुळे आजच्या लेखात जाणून घेऊयात लिंबाचा वापर शारीरिक तक्रारींवर कसा करावा.
डोकेदुखी –
डोकं दुखत असल्यास लिंब कापून त्याचे दोन भाग करावेत. यानंतर गॅसवर एक भाग गरम करून लिंबू त्यावर पिळावा. यामुळे डोकेदुखीपासून त्वरीत आराम मिळेल.
वेट लॉस –
दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि चमचाभर मध एकत्र करून प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.
ऍटीसेप्टिक –
उन्हाळ्यात कित्येकजणांना उष्णतेमुळे नाकातून रक्त येण्याची समस्या जाणवते. अशावेळी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यासाठी कापसाच्या बोळ्यावर लिंबाचा रस घेऊन कापूस नाकात ठेवावा. लिंबातील ऍटिसेप्टिकमुळे अंतर्गत रक्तस्त्राव थांबतो.
कोंड्यावर प्रभावी –
केसात कोंडा झाला असेल तर लिंबू तुम्ही वापरायला हवा. यासाठी लिंबाच्या रसात पाणी टाकून तयार मिश्रण केसांना लावावे. यामुळे केसांतील कोंडा कमी होतो.
अपचन –
अपचन किंवा अजीर्ण झाल्यास लिंबू उत्तम उपाय आहे. यासाठी लिंबू आडवा धरुन त्यावर सुंठ किंवा मीठ घालून गरम करावे. तयार चाटण खावे. यामुळे अपचनापासून सुटका होईल.
पोटदुखी –
पोट दुखत असल्यास लिंबाच्या रसात साखर घालून त्याचे सेवन करावे. यामुळे पोटदुखीपासून आराम मिळतो.
दातदुखी –
दातदुखीची समस्या असेल तर लिंबाचा रस उपयुक्त ठरेल. यासाठी लिंबाचा रस दातांवर आणि हिरड्यांवर घासा. नक्कीच आराम मिळेल.