Friday, March 1, 2024
घरमानिनीHealthकाकडी खाण्याची योग्य वेळ कोणती?

काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Subscribe

शरीराला हायड्रेटेड ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी खूप फायदेशीर आहे. काकडी खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदे होतात. काकडीत व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक काकडीत असतात. काकडी खाल्ल्याने केवळ वजनच नाही तर इतर अनेक फायदे होतात. त्यामुळे नियमित काकडीने सेवन आवर्जून करावे.

काकडी खाण्याचे फायदे

Cucumbers: 6 Benefits, Nutrition, Tips

- Advertisement -
  • काकडी नियमित खाल्ल्याने केसांची वाढ आणि त्वचा चमकदार होते. काकडी त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच काकडीचा रस प्यायल्याने त्वचेवरील डाग जाण्यास मदत होते.
  • डोळ्याभोवती काळी वर्तुळे कमी व्हावीत यासाठी डोळ्यांवर काकडीचे काप कापून ठेवा. यामुळे डोळ्यांखालील काळपटपणा कमी होतो.
  • काकडीमध्ये व्हिटॅमिन के खूप प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात. काकडी खाल्ल्याने हाडं मजबूत होतात.
  • भूक मंदावली असल्यास काकडीचे काप करुन पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे आणि जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते.
  • काकडीमध्ये जास्त कॅलरी असतात. काकडीमध्ये वजन वाढवणारे घटक नसल्याने काकडी खाल्ल्याने वजन वाढत नाही. यामध्ये फायबर खूप प्रमाणात असते. काकडी खल्लाने पोटही भरलेले राहते आणि दुसरा काही खावेसे वाटत नाही.
  • काकडीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे पोटॅशियमसह शरीरातील एँसिड आणि मूत्रपिंडातील अशुद्धता काढून टाकते.
  • काकडीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत होते. आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवता येते.

काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती?

7 Benefits of eating cucumber | HealthShots

 

- Advertisement -

काकडी कितीही आरोग्यदायी असली तरी कोणत्याही वेळी काकडी खाऊ नये. नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवनात तुम्ही काकडी खाऊ शकता. परंतु रात्रीच्या वेळी काकडी खाऊ नये. रात्री काकडी खाल्ल्याने तुमच्या आतड्याच्या हालचालीवर ताण येतो. यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो शिवाय तुम्हाला लघवीचा त्रास होऊ शकतो.

 


हेही वाचा :

दुधीचा रस आरोग्यासाठी उत्तम; होतात अनेक फायदे

- Advertisment -

Manini