Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनामुक्तीनंतरही चव लागत नाही, वास येत नाही ? समोर आले कारण

कोरोनामुक्तीनंतरही चव लागत नाही, वास येत नाही ? समोर आले कारण

वास आणि चव समजायला ५ महिनेही लागू शकतात.

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे चित्र आपण पाहत आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बदल घडलेले पहायला मिळाले. कोरोनाचे बदललेले म्युटंट दिसून आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्दी, ताप,श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला यांसारख्या लक्षणांवरुन कोरोना ओळखला जात होता. पुढे जाऊन कोरोनाच्या लक्षणांमध्ये चव न कळणे, वास न येणे या लक्षणांचा समावेश झाला. वास न येणे गंध न कळणे हे कोरोनाच्या आधी होते असे आपल्याला वाटत होते मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर म्हणजेच कोरोनातुन तुमची मुक्तता झाल्यानंतरही अनेकांना चव न कळणे, वास न येण्याचा त्रास जाणवतो आहे. हा नक्की काय प्रकार आहे? कोरोनातून मुक्त झाल्यावरही काही महिन्यांपर्यंत वास आणि गंध का ओळखता येत नाही? याच विषयी जाणून घ्या.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, कोरोनातून बरे झाल्यानंतर वास आणि चव परत येण्यासाठी काही महिने लागू शकतात. वास आणि चव समजायला ५ महिनेही लागू शकतात. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, कोरोनाचा विषाणू आपल्या घश्यातील नर्व ( ज्या वास आणि चव आपल्या मेंदूपर्यंत पोहचवण्यास मदत करतात ) डॅमेज करतो. त्याचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो आणि त्यामुळे आपला मेंदू चव आणि वास विसरतो. त्यामुळे आपल्या मेंदूला वासाच्या आणि चवीच्या संवेदना समजायला वेळ लागतो. त्यामुळे बऱ्याच जणांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही आपल्याला वास आणि चव कळू शकत नाही. त्याचप्रमाणे कमी लक्षणे असणाऱ्यांनाही ही त्रास होतो.

- Advertisement -

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ५८०जणांचा सहभाग होता. त्यातील काही लोकांना ३०० लोकांना सुरुवातीलाच वास येणे बंद झाले हेते. २०० लोकांना ५ महिन्यांनंतरही वास घेता येत नव्हता. आपल्याला वास म्हणजेच गंध येणे याला एनओस्मीया असे म्हटले जाते. हे एक न्युरोलॉजिकल लक्षण आहे. खरंतर सर्दी,ताप झाल्यावरही आपल्या तोंडाची चव जाते मात्र कोरोनाचे विषाणू अधिक भयंकर असल्याने त्याचा परिणाम आपल्याला दिर्घकाळ जाणवतो. त्याचप्रमाणे इतर आजारतही एनओस्मीया होतो मात्र त्याचा परिणाम दिर्घकाळ राहत नाही. आपल्या मेंदूमध्ये ओलफॅक्टरी नर्व असतात. ज्यामुळे आपल्याला चव आणि वास कळतो. त्यानंतर ओलफॅक्टरी नर्व ती माहिती आपल्या मेंदूला देतात. त्यामुळे आपल्याला वास आणि चव ओळखता येते. मात्र कोरोनाचे विषाणूंमुळे ओलफॅक्टरी नर्व डॅमेज होतात. त्यामुळे आपल्याला वास आणि चव कळत नाही.

आपल्याकडे असा समज आहे की, आपल्या चवीचा संबंध हा जीभेशी आणि तोंडाशी आहे. मात्र चवीचा संबंध हा आपल्या वासाशी असतो. वास ही चवीसाठी मोठे कार्य करते. जर आपला वास घेण्याची भावन गेली तर आपली चव घेण्याची भावनाही जाते. म्हणून कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही काही काळ चव समजत नाही.


- Advertisement -

हेही वाचा – Covid-19 : फुफ्फुसावर हल्ला करणाऱ्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी, काय काळजी घ्याल?

 

 

 

 

- Advertisement -