Tuesday, March 18, 2025
HomeमानिनीReligiousBel Patra : महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे

Bel Patra : महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

महाशिवरात्रीचा सण हिंदू धर्मात खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत. शिवभक्तांसाठी हा एक महत्त्वाचा धार्मिक सण असतो. या दिवशी संपूर्ण देश शिवाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसतो. वर्षभर शिवभक्त या सणाची आतुरतेने वाट पहातात. यंदा 26 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भक्तगण विविध मंदिरात शिवाच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. महादेवाची मनोभावे पूजा करून शिवाला बेलपत्र अर्पण करतात. बेलपत्र शिवाला खूप प्रिय असते असे मानले जाते. महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे आहेत.

बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे –

  1. डोळ्यांशी संबंधित समस्या असल्यास बेलाच्या पानावर तूप लावावे आणि डोळ्यांना शेक द्यावा.
  2. सांधेदुखी असल्यास बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधावी, आराम मिळतो.
  3. हृदयरोग आणि दम्याच्या रूग्णांसाठी बेलाच्या पानांचा काढा प्रभावी आहे.
  4. नुकतीच आई झालेल्या मातेसाठी बेलपत्र फायद्याचे ठरेल. बेलपत्राच्या सेवनाने आरोग्य सुधारते आणि आईच्या शरीरात दुध तयार होते.
  5. रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी बेलपत्राचा रस प्यावा. डायबिटीस रुग्णांसाठी बेलपत्राचा रस फायदेशीर मानला जातो.
  6. रिकाम्या पोटी किमान 4 ते 5 पाने स्वच्छ धुवून चघळून खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते.
  7. अपचनाचा त्रास असेल तर बेलपत्र खाणे फायदेशीर ठरते. यासाठी एक चमचा बेलपत्राच्या रसात मिरपूड आणि काळे मीठ टाकून प्यावे. या उपायामुळे अपचनाचा त्रास होतो.
  8. किडा किंवा मुंगी चावत असल्यास त्यावर बेलपत्राचा रस प्यावा. दादीवर बेलपत्रांचा रस लावल्यास जळजळ कमी होते.
  9. तोंड येण्याच्या समस्येवर बेलपत्र रामबाण उपाय मानला जातो. यासाठी बेलपत्र, कोथिंबीर आणि बडीशेपची चटणी बनवून खाल्ल्याने शरीराती उष्णता कमी होते. परिणामी, तोंड येण्याची समस्या दूर होते.
  10. बेलपत्राच्या एक चमचा रसामध्ये ओवा टाकून प्यायल्याने पोटातील जंत निधून जातात.
  11. एक चमचा बेलपत्र रसामध्ये एक चमचा मध मिसळून घेतल्याने सर्दी-खोकला आणि व्हायरल फिव्हरपासून आराम मिळतो.
  12. बेलाच्या पानांचा काढा हृदयरोग आणि दम्याच्या रूग्णांसाठी प्रभावी मानले जातो.

 

 

 

हेही पाहा –

Manini