Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर लाईफस्टाईल corona pandemic: कोरोनाकाळात आहार कसा असावा?

corona pandemic: कोरोनाकाळात आहार कसा असावा?

Related Story

- Advertisement -

कोरोना माहामारीत स्वत:ला संसर्गापासून बचावण्याबरोबरच मानसिक आणि शारिरीकस्तरावरही फिट राहणं हे मोठे आव्हान आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींसाठी पुन्हा स्वत:ला सशक्त बनवणं हे एखादं लक्ष गाठण्यासारखेच आहे. तज्त्रांच्यानुसार जिवंत राहण्यासाठी जशी हवा, पाणी, निवारा आणि अन्नाची गरज असते तशाच प्रकारे महामारीत शरीर फिट ठेवण्यासाठी योग्य आहाराबरोबरच व्यायामाचीही गरज असते. समतोल पौष्टीक आहार संसर्ग झालेल्या व रिकव्हर झालेल्या व्यक्तींसाठी आवश्यक असतो.

कोरोना संसर्गात शरीर कमकुवत होते. यामुळे थकवा,अशक्तपणा सतत जाणवत असतो. यामुळे योग्य आहार व योग्य व्यायाम अशा व्यक्तींसाठी आवश्यक असतो. तज्त्रांच्यामते ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण मुबलक असते असे पदार्थ खावेत. यात ओट्ससारख्या पदार्थांचा समावेश करावा. यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. त्याशिवाय पनीर, सोयाबिन, चिकन, मासे, अंडी या पदार्थांचाही आहारात समावेश करावा. अक्रोड, बदाम, यांचेही सेवन करावे. फळ, भाज्यांचाही आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. त्यासाठी असा डाएट चार्ट तयार करावा

नाश्ता

- Advertisement -

सकाळी ७ ते ९ या वेळेत नाश्ता करावा. यात बेसनचा चीला, (बेसनाचा पोळा),ओट्स चीला, पोहा, उपमा, इडली, दोन अंड्याचा समावेश करावा. तसेच एक ग्लास दूध प्यावे.

मध्यवेळचा नाश्ता

सकाळी ११ वाजता कुठलेही सिझनल फळ खावे. घरात काहीच नसेल तर एक सफरचंद खावे.

दुपारचे जेवण-लंच

- Advertisement -

दुपारचे जेवण १ ते २ यावेळेत घ्यावेत. यात मल्टीग्रेन चपाती, व्हेज पुलाव, दलिया, खिचडी, भाजी, वरण भात खाऊ शकता. जर तुम्ही दोन चपात्या खात असाल तर त्यासोबत दीड वाटी भाजी खावी. एक वाटी दही आणि सॅलेडही घ्यावे. पाणीही पित राहावे.

दुपारी ४ वाजता व्हेजिटेबल सूप, चिकन सूप, स्प्राऊट्स सूप, तसेच चहा किंवा कॉफीबरोबर बदाम खावेत.

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण शक्यतो संध्याकाळी ७ ते ८ यादरम्यान घ्यावे. सॅलेडचा समावेश करावा. विटामिन सी, डी, झिंक आणि मिनरल्सयुक्त आहाराचा रात्रीच्या जेवणात समावेश करावा.

रात्री झोपण्यापूर्वी

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास हळद दूध घ्यावे. आठ तासाची झोप आवश्यक असल्याने वेळेत झोपावे.

या गोष्टींपासून राहा दूर

  • डबाबंद पदार्थ, जंक फूड, मसालेदार जेवण, तळलेले पदार्थ, कोल्ड किंवा गोड ड्रींक्सचे सेवन करू नये. तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतो.
  • व्यायामात चालण्याला प्राधान्य द्यावे. तसेच तज्त्रांचा सल्ला घ्यावा.

- Advertisement -