गुगल असा एक प्लॅटफॉर्म आहे जेथे आपल्याला विविध प्रकारची माहिती अगदी सहज मिळते. हेच कारण आहे की, बहुतांश लोक आपल्या वेळेनुसार गुगल सर्चची मदत घेतात. ज्यामुळे योग्य माहिती आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळते.
गुगल आणि त्या सारख्या सुचना एकत्रित करणाऱ्या आणखी काही कंपन्या प्रत्येक वर्षी रिपोर्ट्स जारी करतात. त्यात लोक सर्वाधिक काय सर्च करतात, कोणत्या वयातील आहेत, कोणत्या वर्गातील आहे अशा सर्व गोष्टींची माहिती त्या रिपोर्ट्समध्ये दिली जाते.
महिलांनी सर्वाधिक काय सर्च केले?
रिपोर्ट्सनुसार, भारतातील एकूण इंटरनेट युजर्सपैकी 40 टक्के या महिला आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या अविवाहित महिलांची आहे. अशातच त्यांनी रात्री गुगलवर काय सर्च केले याबद्दल रिपोर्ट असे सांगतो की, त्यांनी आपल्या करियर संबंधित काही गोष्टी सर्च केल्या. जसे की, कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, कोणता विषय निवडवावा असे.
गुगलवर महिलांनी शॉपिंग साइट्सवर अधिक जातात. यामध्ये कपडे ते खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा सर्च करतात. या व्यतिरिक्त मेहंदी डिझाइन्स, रंगोळी, होम डेकोर डिझाइन सारख्या गोष्टी सुद्धा सर्च केल्या जातात. तसेच महिला गुगलवर रोमँन्टिक गाणी ही सर्च केल्याव्यतिरिकक्त अन्य प्रकारची गाणी ही पाहतात.
तसेच ब्युटी संदर्भात ही महिला हॅक्स सर्च करतात. त्यामध्ये चेहरा उजळ होण्यासाठी ते केसांना सुंदर बनवण्याच्या टीप्स सर्च ही केल्या गेल्या.
हेही वाचा- अचानक पाहुणे आलेत, मग झटपट असा आवरा पसारा