फ्रिजमध्ये ठेवलेले कणिक काळं आणि कडक होतं? मग वापरा ‘या’ टीप्स

महिला बऱ्याचवेळा वेळेची बचत व्हावी यासाठी रात्रीचं किंवा सकाळी जास्तीचे कणिक मळून ते फ्रीजमध्ये ठेवतात. तर काहीवेळा प्रमाण चुकल्याने अनावधनाने जास्तीच कणीक मळले जाते. पण नंतर ते कणिक काळं पडतं किंवा आंबट होत. यामुळे या काळवंटलेल्या कणकेच्या पोळ्याही काळपट आणि चवीला आंबूस लागतात. पण जर कणिक फ्रिजमध्ये ठेवतानाच नीट काळजी घेतली तर कणिक खराब होत नाही आणि त्याच्या पोळ्याही मऊ लुसलुशीत होतात.

research finds salt affects blood flow in brain

पीठात मीठ टाकावे-पीठ भिजवताना त्यात मीठ टाकावे. कारण मीठ पीठातील सूक्ष्म विषाणूंच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे भिजवलेले पीठ बराचकाळ टीकते.

कोमट पाणी किंवा दूधाचा वापर- पीठ मळताना आपण थंड पाण्याचा वापर करतो. पण जर पीठ फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर पीठ भिजवताना कोमट पाण्याचा किंवा दूधाचा वापर करावा.

ghee

पीठात तेल किंवा तूपाचा वापर- कणिक भिजवल्यावर त्यावर तेलाचा किंवा तूपाचा हात लावावा. त्यामुळे पीठ काळे पडणार नाही. दोन दिवस हे पीठ फ्रेश राहते.

हवाबंद डब्याचा वापर-बरेचजण कणिक कुठल्याही डब्यात ठेवून ते फ्रिजमध्ये ठेवतात. त्यामुळे हे कणिक दुसऱ्या दिवशी कडक कर होतेच शिवाय त्याच्या पोळ्याही वातड होतात. तर कधी कधी कणिक काळे पडते. यामुळे भिजवलेले कणिक शक्यतो हवांबद घट्ट झाकण असलेल्या डब्यात भरून तो फ्रिजमध्ये ठेवावा. किंवा अॅल्यिमिमियम फॉईल पेपरमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावे. कणिक फ्रेश राहते.