घरदीपोत्सवगव्हाचे नानकटाई

गव्हाचे नानकटाई

Subscribe

गव्हाचे नानकटाई रेसिपी

बऱ्याचदा मैद्याचे नानकटाई केले जातात. तसेच त्या नानकटाईची अनेकांना रेसिपी देखील माहिती असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला गव्हाचे नानकटाई कसे बनवायचे ते सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • १ वाटी गव्हाचे पीठ
  • अर्धा वाटी बटर किंवा तूप
  • अर्धा वाटी पिठीसाखर
  • ३ टेबलस्पून डेसीनेट कोकनट
  • ३ टेबलस्पून टुटीफ्रुटी

कृती

प्रथम एका भांड्यात पिठीसाखर आणि बटर मिक्स करून घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे पीठ घाला आणि व्यवस्थित मळून घ्या. चांगलं मळून झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि नानकटाईला हवा तो आकार द्या. त्यानंतर नानकटाईला डेसीनेट कोकोनट लावून घ्या. गॅसवरती मोठं पातेले किंवा कढई प्री-हीट करायला ठेवावी आणि कढई किंवा पातेल्यात जे तुम्ही ताट ठेवणार आहात त्याला बटरने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यावे. पातेल्यामध्ये रिंग ठेवावी त्यानंतर तुम्ही पातेल प्री- हिट झाल्यावर त्यामध्ये ताटात नानकटाई प्री-हीट करण्यासाठी ठेवावे गॅसची फ्लेम लो ठेवावी वीस मिनिटे नानकटाई बेक करून घ्यावी त्यानंतर गॅस बंद करावा. अशाप्रकारे घरच्या घरी नानकटाई तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -