घरलाईफस्टाईलगव्हाच्या पिठाचा कराची हलवा

गव्हाच्या पिठाचा कराची हलवा

Subscribe

बऱ्याचदा अनेकांना गोड खावेसे वाटत असते, अशावेळी काय करावे, असा प्रश्न पडतो. आज तुमच्यासाठी असाच खास पदार्थ घेऊन आलो आहोत तो म्हणजे गव्हाच्या पिठाचा कराची हलवा.

साहित्य

  • १ वाटी गव्हाचे पीठ
  • ३ वाटी पाणी
  • २ वाटी साखर
  • २ वाटी पाणी
  • २ चमचा लिंबू रस
  • १/२ वाटी कॉनफ्लॉवर
  • १ वाटी पाणी
  • चिमूटभर खाण्याच्या रंग
  • ड्रायफ्रूट
  • १/४ चमचा इलायची पूड
  • १/४ वाटी तूप

कृती

सर्वप्रथम गव्हाचे पीठ घेऊन त्यात पाणी घालून एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर पुन्हा पाणी घालून चांगले मिक्स करुन घ्या. नंतर हे मिश्रण १ तास तसेच ठेवावे. एका तासानंतर पाहिल्यास पीठ खाली राहते आणि पाणी वर येते. हे वर आलेले पाणी काढून घ्यावे. एका पॅनमध्ये दोन कप पाणी घालून गरम करावे. त्यानंतर त्या पाण्यात साखर विरघळल्यानंतर दोन चमचे लिंबाचा रस घालावा. नंतर एका भांड्यात कॉनफ्लॉवर घेऊन त्यात एक कप पाणी घालावे आणि एकजीव करुन घ्यावे. नंतर तयार असलेल्या गव्हाच्या पिठात कॉनफ्लॉवर घालून मिक्स करुन घ्यावे. आता तयार असलेल्या साखरेच्या पाकात ते मिश्रण घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर त्यात १ चमचा तूप, काजू-बदाम आणि खाण्याचा रंग घालून घ्यावा. नंतर एका भांड्याला चांगले तेल लावून नंतर त्यात ते मिश्रण ओतावे. अशाप्रकारे गव्हाच्या पिठाचा मुंबईचा प्रसिद्ध कराची हलवा तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -