Thursday, April 18, 2024
घरमानिनीसोलो ट्रिपला जाताना 'या' गोष्टी अवश्य सोबत ठेवा

सोलो ट्रिपला जाताना ‘या’ गोष्टी अवश्य सोबत ठेवा

Subscribe

गेल्या काही काळापासून तरुणाईमध्ये सोलो ट्ट्रिपचा ट्रेंड सुरु आहे. तुमचा कम्फर्ट झोन सोडून बाहेर निघणे, एकट्याने प्रवास करणे, प्रचलित नसलेली पर्यटन स्थळे पाहणे यासर्वांसाठी सोलो ट्रॅव्हलिंग करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. तुम्हीही जर सोलो ट्रिपचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी तुम्ही सोबत ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. आज आम्ही तुम्हला सोलो ट्रिप करताना कोणत्या गोष्टी सोबत ठेवणे गरजेचे आहे हे सांगणार आहोत.

महत्वाचे कागदपत्रे –
सर्वात महत्वाचे म्हणजे सोलो ट्रीपला जाताना महत्वाची कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते. साधारपणे लोक कागदपत्र हरविण्याच्या भीतीने सोबत ठेवत नाही. मात्र, असे केल्याने प्रवासात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. यासह तुम्ही कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी सुद्धा तुमच्या फोनमध्ये ठेवायला हव्यात.

- Advertisement -

आवश्यक औषधे –
सोलो ट्रीपला जाताना आवश्यक औषधे जरुर सोबत ठेवावीत. कधी कधी सोलो ट्रीपला गेल्यावर एकटेपणाने अस्वस्थ वाटू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला जवळ बाळगलेली औषध उपयोगी ठरतील. एवढेच नव्हे तर तुमची दररोजची औषधे सुद्धा तुम्ही सोबत ठेवायला हवीत.

सेफ्टी किट –
जर तुम्ही सोलो ट्रीपला जाणार असाल तर सेफ्टी किट अवश्य सोबत बाळगा. ज्यामध्ये टॉर्च, डक्ट टेप, वही, पेन, डायरी, शिट्टी आदी वस्तू सोबत ठेवाव्यात.

- Advertisement -

इलेक्ट्रॉनिक वस्तू –
सोलो ट्रीपमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू अवश्य सोबत ठेवा. उदाहरण द्यायचे झाल्यास चार्जर, पॉवर बँक, कॅमेरा आणि त्याच्याशी संबंधित वस्तू तुम्ही सोबत ठेवायला हव्यात.

फस्ट एड किट –
सोलो ट्रॅव्हल करताना फस्ट एड किट अवश्य सोबत ठेवा. प्रवास करताना तुम्हाला कुठे जखम झाल्यास अशावेळी फस्ट एड किट उपयोगी ठरते.

 


हेही वाचा ; हिवाळ्यात पिकनिकला जाण्याआधी ‘या’ वस्तू ठेवा सोबत

- Advertisment -

Manini