घरलाईफस्टाईलनवजात बाळाला लगेच घराबाहेर नेऊ नका! वाचा कारण

नवजात बाळाला लगेच घराबाहेर नेऊ नका! वाचा कारण

Subscribe

तुमच्या घरात नवजात बाळ आहे? जर असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची

तुमच्या घरात नवजात बाळ आहे? जर असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने लहान मुलांसह नवजात बाळांना देखील सध्याच्या वातावरणात घराबाहेर फिरायला नेणं योग्य नाही असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मात्र नवजात बाळाच्या जन्मानंतर आईला साधारण दीड महिना आराम करणं आवश्यक असतं. दरम्यान, नवजात बाळाला किती दिवसांनी घरा बाहेर नेता येईल, यासंदर्भात अनेक पालकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतात. तर काहींच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे नवजात बाळाला किती दिवसांनी घरा बाहेर न्यावे, यासह कोणती योग्य वेळ आहे, घरा बाहेर न्यायचे तर कुठे घेऊन जायला हवे… जाणून घ्या सविस्तर

जर नवजात बालक निरोगी असेल आणि आरोग्याची कोणतीही समस्या नसेल तर अशा परिस्थितीत डॉक्टर या बालकाला कोणत्याही वेळी घराबाहेर नेण्याचा सल्ला देऊ शकतात. जन्मानंतर कमीतकमी दोन महिने प्रीमॅच्युअर बाळाला किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या नवजात बालकाला घरा बाहेर न नेण्याचा सल्ला दिला जातो. तर यावेळात, नवजात बालकाची प्रतिकारशक्ती विकसित होण्यास मदत होते. दरम्यान, प्रदूषणमुक्त वातावरणात नवजात बाळाला घरा बाहेर नेणं चांगले असले तरी बाळाच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

- Advertisement -

मात्र नवजात बालकांना घराबाहेर नेल्यानंतर त्यांना अनेक प्रकारचे फायदे देखील होऊ शकतात. जसे की…

  • नवजात बाळाच्या वाढीसाठी आणि रोग प्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते. मात्र असे असले तरी नवजात बाळाला दिवसात १५ मिनिटांपेक्षा जास्त सूर्यप्रकाश देणं घातक ठरू शकते.
  • यूनिवर्सिटी ऑफ लिवरपूलमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, सकाळच्या कोवळ्या उन्हात नवजात बालकाला नेल्यास त्याला रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.
  • नवजात बालकाची प्रतिकार शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. मात्र नवजात बाळाला योग्यवेळी घरा बाहेर नेल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आणि आजाराशी लढण्याची शक्ती बाळाला मिळते.

तसेच नवजात बाळाला कोवळ्या उन्हात नेणं हे फक्त बाळालाच नाही तर त्याच्या आईला देखील फायदेशीर ठरते. जर तुमचे नवजात बालक स्वस्थ आहे. तर त्याला घराबाहेर नेण्यास कोणतीही जोखीम नाही. परंतु असे असले तरी त्या लहान बाळाला जास्त माणसांच्या संपर्कात नेणं धोक्याचं असू शकते. गर्दीच्या ठिकाणी जर नवजात बालक एखाद्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास या बाळाला आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.


व्हॅक्सिंग केल्यावर तुमच्या त्वचेवरही येतो पुरळ? मग ‘हे’ करा उपाय

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -