घरलाईफस्टाईलजाणून घ्या : मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे योग्य की अयोग्य

जाणून घ्या : मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे योग्य की अयोग्य

Subscribe

मासिक पाळीबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत.

जेव्हा मुली तारुण्यात पदार्पण करतात तेव्हा शरीरात अमाप बदल होत असतात. शरीर वेगाने परिपक्व होत असते आणि शरीरात अनेक बदल हे झपाट्याने होत असतात. अशा अनेक शारीरिक बदलांप्रमाणे मासिक पाळी हा प्रमुख बदल असतो. स्त्रियांसाठी, मासिक पाळीचे पहिले तीन दिवस खूप त्रासदायक असतात. या काळात स्त्रियांना थकवा, पोटदुखी, मनःस्थिती बदलणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हल्ली अनेक स्त्रिया व्यायामाला प्राधान्य देतात. परंतु मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे योग्य आहे की नाही याबाबतची माहिती कोणालाच नसते. मासिक पाळीबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत.

बहुतांश महिला या मासिक पाळी दरम्यान विश्रांती घेतात. मात्र मासिक पाळी दरम्यान हलक्या व्यायामामुळे शरीरात कोणतीही समस्या उद्भवत नाही. व्यायाम करायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या शरीरावर आणि आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. परंतु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळी दरम्यान थोडासा व्यायाम करणे केवळ सुरक्षितच नाही तर असे दिसून आले आहे की यामुळे मासिक पाळीच्या पूर्व सिंड्रोमची लक्षणे कमी होतात. इतकेच नाही तर या कालावधी दरम्यान व्यायाम केल्यास, पोटदुखीपासून आराम मिळतो. व्यायामा दरम्यान महिलांनी जास्त वजन असलेल्या वस्तू उचलू नयेत याची काळजी घ्यावी. जेव्हा आपण व्यायाम करता तेव्हा आपले शरीर अँड्रोफिन नावाचे एक संप्रेरक सोडते जे मासिक पाळीमुळे उद्भवणारे ताण, डोकेदुखी अशा अन्य वेदनांपासून मुक्त होण्यास मदत करते.

- Advertisement -

हेही वाचा –उद्धव ठाकरे हे सचिन वाझेंचे वकील, दुसऱ्या वकिलाची त्यांना गरज नाही – फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -