सुट्टीच्या दिवशी हमखास लॉंग ड्राइव्हचा प्लॅन केला जातो. काहींना बाइकने तर काहींना कारने फिरायला आवडते. कुटूंबासोबत फिरायचे असल्यास कारने जाण्याचा प्लॅन आखला जातो. कारने फिरताना आजुबाजूच्या आल्हाददायक वातावरणाचा एक रोमांचक अनुभव घेता येतो. पण, लहान मुलांसह लॉंग ड्राइव्हला जाताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे कारने रोड ट्रिपला निघण्यापूर्वी गाडीची नीट तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमची रोड ट्रिप मजेदार नक्कीच होईल.
लक्षात घ्या या गोष्टी
- निघण्यापूर्वी एक – दोन दिवस आधी कारच्या सर्व लाइट्स व्यवस्थित चेक करुन घ्याव्यात. कारण कारच्या लाइट्समध्ये काही प्रॉब्लेम आल्यास ट्रॅव्हल करताना मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
- कारने लॉंग ड्राइव्हचा प्लॅन करताना एसी नीट तपासून घ्यावा. गरज असल्यास एसीची सर्व्हिसींग करून घ्यावी.
- कारने लॉंग ड्राइव्हवर निघण्याआधी गाडीतील ऑइल आणि कूलेंट व्यवस्थित चेक करावे. जर ऑइल कमी असेल तर भरावे आणि एक्स्ट्रा कूलेंट बॉटल सोबत ठेवावी.
- प्रवास करण्यापूर्वी गाडीचे वायपर ब्लेड देखील तपासावी. प्रवास करताना ही गोष्टी खूप महत्त्वाची असते.
- कारने फिरण्याचा प्लॅन करताना गाडीचे टायर तपासणे अत्यंत महत्वाचे आहे. जर कारचे टायर जीर्ण किंवा फाटलेले असतील तर निघण्यापूर्वी बदलावेत.
- लॉंग ड्राइव्हला निघण्यापूर्वी तुमच्याकडे महत्वाची कागदपत्रे आहेत का नाही हे तपासावे. यात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणीचे पेपर यांचा समावेश येतो.
- प्रवास करताना हवामान बदलले तर प्रवास थांबवावा आणि कार सुरक्षित ठिकाणी पार्क करावी.
- प्रवास करताना गरजेइतकी कॅश सोबत ठेवावी.
- लॉंग ड्राइव्हला जाताना सीट बेल्ट लावावा आणि डिजीटल मॅपचा वापर करावा.
हेही पाहा –