कित्येकजणांना कुठेही गेल्यावर तेथील क्षण कॅमेरात कैद करण्याची सवय असते. हल्ली तर मोबाईलमधीलच कॅमेरे इतके इन्हान्स झाले आहेत की, फोटो काढण्यासाठी कोणत्याही महागड्या कॅमेराची गरजच पडत नाही. कॅमेरा म्हटले की, फोटो आणि फोटोग्राफी आलीच. फोटोंची आवड असल्याने अनेकांना फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. मात्र, करिअर करायचे म्हणजे नेमकं काय शिकायचे? हे मात्र कित्येकजणांना ठाऊक नसते. सध्याचे युग तर डिजिटलचे आहे. या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. पण, कदाचित फोटोग्राफी असे क्षेत्र आहे ज्यामध्ये थोडेसे ज्ञान असले तरी तुम्ही चांगले करिअर करू शकता. आजच्या या लेखात जाणून घेऊयात फोटोग्राफी क्षेत्रात करिअरचे बेस्ट ऑप्शन्स,
वेडिंग फोटोग्राफी – वेडिंग फोटोग्राफर होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पदवी किंवा कोर्सची आवश्यकता नसते. यासाठी केवळ फक्त लेन्स, अॅंगल आणि कॅमेरा हॅंडल करण्याचे योग्य ज्ञान असायला हवे.
फूड फोटोग्राफी – हल्ली अनेक हॉटेलधारकांना बनवलेल्या पदार्थांची जाहिरात करण्यासाठी प्रोफेशनल फोटोग्राफर्सची गरज असते. अशावेळी तुम्ही हा प्रकार निवडून त्यात नक्कीच करिअर करू शकता.
वाईल्ड लाइफ फोटोग्राफी – तुम्हाला निसर्गाचे फोटो काढायला आवडत असतील तर ही फिल्ड योग्य राहील. अनेक पर्यावरणीय संस्था किंवा चॅनेल्स, ट्रॅव्हल्स कंपन्यासाठी तुम्ही काम करू शकता.
फॉरेन्सिक फोटोग्राफी – तुमच्यात धैर्य आणि सामर्थ्य असेल तर फॉरेन्सिक फोटोग्राफीचा पर्याय उत्तम असेल.
फोटोजर्नलिस्ट – यात तुम्ही एखाद्या वृत्तपत्रासाठी, वेबसाईटसाठी लोकेशनवर जाऊन फोटोग्राफीच्या माध्यमातून बातमी उघड करणे अपेक्षित असते. फक्त यासाठी तुमच्याकडे संबंधित विषयाचं प्राथमिक ज्ञान, बातमीची समज असणे गरजेचे आहे.
फॅशन फोटोग्राफी – फॅशन फोटोग्राफर होण्यासाठी फॅशन फोटोग्राफी किंवा संबंधित क्षेत्रात प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा, डिग्री असणे आवश्यक आहे. एखाद्या ब्रॅंडसोबत काम करून तुम्ही तुमचे करिअर करू शकता.
स्टुडिओ फोटोग्राफी – हा फोटोग्राफीतील अत्यंत बेसिक पण सर्वाधिक मागणी असलेला प्रकार आहे. पॅनकार्ड किंवा आयडीसाठी लागणारे फोटोस् आपल्याला स्टुडिओमध्ये जाऊन काढावे लागतात. त्यामुळे हा पर्याय सुद्धा योग्य राहिल.
हेही पाहा –