धावपळीच्या आणि स्पर्धांत्मक जगात वावरताना ताणतणाव येणे एक सामान्य समस्या आहे. अगदी शाळकरी विद्यार्थीपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यत सर्वानाच ताण, टेन्शन आहे. एखाद्या गोष्टीचा ताण घेऊन काही होत नाही, हे आपणाला माहित असते. पण, ताण घेण्याची सवय काय कोणी सोडत नाही. कधी कधी चिंता, ताण वाढल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे ताणतणावापासून दूर राहावे असे तज्ञ सांगतात. अनेकजण ताणापासून मुक्ती मिळावी यासाठी एक्ससरसाइज करण्याचा सल्ला देतं तर कोणी आहारकडे लक्ष द्यावे असे सांगते. आहारतज्ञांच्या मते, ताणतणाव कमी करण्यास फळे खाणे फायद्याचे ठरेल असे सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात मानसिक ताण कमी करण्यासाठी कोणती फळे खावीत
संत्री –
एका अभ्यासानुसार, मानसिक ताण कमी करण्यासाठी आंबट फळे खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संत्र्यासारखी आंबट फळे नैराश्याचा धोका कमी करतात. दररोज एक संत्री खाल्ल्याने नैराश्य जवळपास 20 टक्क्यांनी कमी होते असे रिसर्चनुसार सांगण्यात येत आहे. कारण यातील फॅकॅलिबॅक्टेरियम प्रुस्नित्झी बॅक्टेरिया वाढवण्यास मदत होते. खरं तर हा बॅक्टेरिया आतड्यात आढळतो, जो आरोग्याच्यादृष्टीने चांगला असतो. यामुळे नैराश्य कमी होऊन मूड सुधारतो.
पेरू –
व्हिटॅमिन सी समृद्ध फळांच्या सेवनाने मानसिक ताण कमी होतो. यातील व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांशी लढू शकता. परिणामी, मानसिक ताण तुम्हाला येत नाही.
द्राक्ष –
द्राक्षांमध्ये पाणी, सोडियम, पोटॅशियम, लोह भरपूर प्रमाणात आढळते. मानसिक ताण कमी करण्यासाठी डॉक्टर द्राक्ष खाण्याचा सल्ला देतात.
किवी –
स्ट्रेस बस्टर म्हणून किवीकडे पाहिले जाते. यातील लोह आणि फॉलिक ऍसिड तणावाचा सामना करण्यासाठी बेस्ट आहे.
केळी –
केळ्यातील व्हिटॅमिन्स, पोटॅशियम, फॉस्फरस ताणतणाव कमी करतात. मेंदूही शांत होतो. तुम्हाला वारंवार स्ट्रेस जाणवत असेल तर केळी खायला हवीत.
हेही पाहा –