महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्याचे वेगवेगळ्या सभारंभातले ड्रेसेस आणि साड्या असतात. यामध्ये इनरवेअर हा खूप महत्वाचा विषय आहे. इनरवेअर जर योग्य असेल तर आपला ड्रेस किंवा साडी परफेक्ट दिसते. शरीराचा जो काही आकार असेल तर तो अशा इनरवेअरमुळे लपून जातो आणि आपला बॉडी शेप छान वाटतो. महत्वाचा म्हणजे इनरवेअर घालताना चुकीचे घालू नये त्यामुळे बॉडी स्ट्रक्चर विचित्र दिसत.
बॅकलेस ब्रा अशी वापरा –
बॅकलेस लेहेंगा ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक मुलीला घालायची असते. तसेच त्या लूकमधे परफेक्ट दिसण्यासाठी तसा ब्लाउज शिवावा लागतो. त्यामुळे बॅकलेस लेहेंगा घालताना ब्लाउज डिझाइनसाठी स्ट्रॅपलेस ब्रा किंवा स्टिक-ऑन ब्रा आवश्यक असते. त्यामुळे बॅकलेस ब्लाउज घालताना कोणतीही अडचण येत नाही.
अंडरवायर्ड ब्रा-
अंडरवायर्ड ब्रा हि पॅडिंग आणि नॉन-पॅडिंग या दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आवडीच्या पॅडिंग प्राधान्यानुसार तुम्ही अंडरवायर्ड ब्राच्या कोणत्याही प्रकारात ब्रा निवडू शकता. तसेच अंडरवायर्ड ब्रा कोणत्याही पोशाखात घातली जाऊ शकते. मग ती टी-शर्ट, कुर्ती, शर्ट्स, बॉडी-हगिंग ड्रेस, मॅक्सी ड्रेस, एथनिक वेअर अशा कोणत्याही कपड्यात ती घालू शकतो.
प्लंज ब्रा-
लेहेंगा ब्लाउजसाठी प्लंज ब्रा हा सर्वात आवडीचा आणि घालायला सोपा असा पर्याय आहे. आणि तो तुम्हाला डीप नेक ब्लाउजशी जुळवायचा असेल तर आणखी परफेक्ट लूक देतो. हि ब्रा कॉमन ब्रा म्हणून काम करत नाही तर एक परफेक्ट लूक देतो.
मल्टी ब्रा –
मल्टीवे ब्रा ही कधीही कोणत्याही प्रकारच्या लेहेंगा आणि ब्लॉउजच्या डिझाइनमध्ये परिधान केली जाणारी सर्वात अष्टपैलू ब्रा आहे. हि ब्रा अनेक बेल्टने परिपूर्ण असते. तसेच हे बेल्ट आपल्या इच्छेनुसार आपण बदलू शकतो. तसेच आपल्या ड्रेसनुसार हा बेल्ट ऍड्जस्ट करता येईल.
स्ट्रॅपलेस ब्रा-
सणासुदीच्या काळात तुम्ही स्ट्रॅपलेस ब्राने तुमची स्टाईल अनेकप्रकारांनी दाखवू शकता. तुमच्या आउटफिटला स्टाइल करण्यासाठी स्ट्रॅपलेस ब्रा हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच सणासुदीच्या काळात आपल्याला साडी नेसायची असेल तर स्ट्रॅपलेस ब्रा तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला हवी.
हेही वाचा :
Fashion Tips : समुद्रकिनारी फिरायला जाताय, मग वापर ‘हे’ स्टायलिश कपडे