मीठ हा आपल्या अन्नातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मीठामुळे पदार्थांला चव येते. यासह आपल्या शरीरासाठी मीठ खूप महत्त्वाचे आहे. मीठामध्ये सोडियम क्लोराइड असते, जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, एका व्यक्तीला सरासरी 5 ग्रॅम मीठ लागते. पण, आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात पदार्थांमार्फत जवळपास 11 ग्रॅम मीठ जाते. ज्याचा परिणाम म्हणजे शरीरात मिठाचे सेवन अति झाल्याने होणारा रक्तदाब. खरं तर मीठाच्या अतिसेवनाने केवळ रक्तदाबच नाही तर अनेक शारीरिक व्याधी सुरू होतात. पांढरे किंवा सैंधव मीठ बहुतेक लोक वापरतात. पण, आरोग्याच्यादृष्टीने पांढरे मीठ योग्य नसल्याने अनेकजण सैंधव मीठाचा वापर करतात. पण, नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात एक बाब समोर आली आहे जाणून घेऊयात.
संशोधन काय सांगते –
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार सैंधव मीठामुळे थायरॉइडच्या पातळीत वाढ झाली आहे. एकदंरच, मीठाचा प्रकार बदलण्याऐवजी त्याचे प्रमाण कमी करायला हवे, असे तज्ञ सांगत आहेत.
जास्त मीठाचे परिणाम –
- तज्ञांच्या मते, तुमच्या थॉयरॉइच्या रिपोर्टमध्ये सतत चढ-उतार होत असतील तर नवीन औषधे सुरू करण्यापूर्वी मीठ बदलू शकता. मीठ बदलण्याचा सल्ला तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही गर्भवती असाल तर डॉक्टरांच्या सल्लानुसार मीठाबाबत निर्णय घ्यावा.
- तुम्ही आई होण्याच्या विचारात असाल किंवा गर्भधारणेचे नियोजन करत असाल आणि डॉक्टरांनी थायरॉक्सिन घेण्यास सांगितले असेल तर घ्यावे.
- डॉक्टर म्हणतात की गुलाबी मीठासारख्या मीठांमध्ये चांगले मिनरल्स असतात पण यात पुरेसे आयोडीन नसते. मीठामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, स्वयंपाक करताना कमी मीठ वापरा आणि त्याचा प्रकार बदलू नका.
या गोष्टी कमी कराव्यात –
- आहारातून पापड, लोणच्यासारखे पदार्थ कमी करावेत.
- तांदूळ किंवा पिठात जास्त मीठ मिक्स करू नये.