सकाळच्या नाश्त्यात अनेकांना ब्रेड खायची सवय असते. ब्रेड खाल्यावर पोट भरते आणि हा नाश्ता बनवण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे बहुतेकजण ब्रेड-बटर, टोस्ट किंवा साधे सॅंडविच खाण्याला प्राधान्य देतात. पण, तज्ञांच्या मते, रोज सकाळी नाश्त्यात ब्रेड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. ब्रेड खाल्ल्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात. ब्रेड खाल्ल्यामुळे आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घेऊयात
ब्रेड खाण्याचे दुष्परिणाम-
ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि रिफाइन्ड साखर असते. या गोष्टींमुळे वजन खूप जलद गतीने वाढते. यासह ब्रेड खाल्यावर भूक लागते. ज्यामुळे आपण वारंवार खातो. तुम्ही जर वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असाल तर चुकूनही सकाळच्या नाश्त्यात ब्रेड खाऊ नये.
सकाळच्या नाश्त्यात ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. ब्रेडमध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्बोहायड्रेटस असतात, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. रक्तातील साखर वाढल्याने डायबिटीस रुग्णांसाठी हे हानिकारक ठरू शकते.
ब्रेडमध्ये ग्लूटनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनसंस्थेवर परिणाम झाल्याने गॅस, बद्धकोष्ठता निर्माण होते. त्यामुळे वांरवार पोटाच्या तक्रारी जाणवत असेल तर ब्रेड खाणे टाळायला हवे.
ब्रेड खाल्ल्यामुळे दिवसभर थकवा आणि झोप येते. एकूणच तुमची एनर्जेटिक पातळी कमी होते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर सुस्ती येते.
कोणता ब्रेड खावा –
जर तुम्हाला ब्रेड खायचाच असेल तर कधीतरी खावे. दररोज खाणे टाळावे याशिवाय कमी प्रमाणात खावेत. तुम्ही व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन, मल्टीग्रेन ब्रेड खाऊ शकता. यामुळे आरोग्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही आणि ब्रेडमधील पौष्टिक घटक आरोग्यासाठी फायद्याचे ठरतील.
हेही पाहा –