आजकाल अनेकांचे केस कमी वयातच पांढरे होऊ लागतात. अशावेळी पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारातील वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो, परंतु त्यातील केमिकलमुळे केस कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काही खास घरगुती पदार्थांचे उपाय घेऊन आलो आहोत. याच्या वापराने तुम्ही तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करु शकता. तसेच याच्या वापराने तुमचे केस दाट आणि चमकदार देखील होतील.
केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय
- चहा पावडर
चहा पावडरला उकळवून घ्या आणि केसांवर त्याचा लेप लावा. या उपायाने तुमचे केस हळूहळू काळे होतील. याशिवाय चहा पावडरची बारीत पावडर करून घ्या आणि त्यात लिंबाचा रसाचे काही थेंब टाका. हे मिश्रण केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका.
- आवळा पावडर
आवळा आयुर्वेदिक असल्यामुळे तो केसांसाठी खूप उपयुक्त आहे. एका भांड्यात एक कप आवळा पावडर काळसर होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात 500 मिलीलीटर नारळाचे तेल टाकून, मंद आचेवर 20 मिनिटापर्यंत गरम करा. 24 तासानंतर म्हणजेच एक दिवसानंतर एका बाटलीमध्ये हे तेल भरून ठेवा. आणि आठवड्यातून 2 वेळा हे तेल तुमच्या केसांमध्ये लावा. यामुळे नैसर्गिकरित्या तुमचे केस काळे होतील.
- कढी पत्ता
कढी पत्त्याला 2 चमचे आवळा पावडर आणि 2 चमचा ब्राम्ही पावडर सोबत एकत्र वाटून घ्या. या मिश्रणामध्ये पानी मिक्स करून पेस्ट तयार करा आणि अर्ध्या तासापर्यंत हे केसांमध्ये लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या.
हेही वाचा :