आपल्या देशातील प्रमुख अन्नापैंकी एक म्हणजे भात. भाताशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. काहींना तर दुपारच्या जेवणातही भात खायला आवडतो. भात हा असा पदार्थ आहे की, जो कमी वेळात तयार होतो शिवाय बनवण्यासाठी अधिक मेहनत सुद्धा घ्यावी लागत नाही. सामान्यपणे, आपल्या देशात पांढऱ्या तांदळाचा भात खाल्ला जातो. पांढऱ्या तांदळाचा भात सहजपणे पचतो. अनेकजण पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन तांदळाचा भात खाण्याला प्राधान्य देतात. पण, प्रश्न शेवटी एक उरतोच आरोग्यासाठी कोणत्या तांदळाचा भात आपण खायला हवा, पांढरा की ब्राऊन?
पांढरा की ब्राऊन राइस आरोग्यासाठी फायदेशीर हे समजण्यासाठी त्यातील पोषक घटकांची माहिती असणे आवश्यक आहे.
पांढरा राइस –
- पांढऱ्या तांदूळातून शरीराला लवकर उर्जा मिळते.
- पांढऱ्या तांदळात व्हिटॅमिन्स, फायबर आढळतात.
- पांढरे तांदूळ लवकर शिजतात.
- पचण्यास हलके अशी पांढऱ्या तांदळाची ओळख आहे.
- पांढऱ्या तांदळात फायबर आणि फॅटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पांढरा तांदूळ दररोज खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
ब्राऊन राइस –
- ब्राऊन राइस एक कॉम्प्लेक्स राइस आहे. त्याची चव खास नसते.
- ब्राऊन राइसमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन आणि फॅट्स आढळतात.
- ब्राऊन राइस पचण्यास हलका नसतो.
- ब्राऊन राइसच्या सेवनाने शरीरातील जळजळ कमी होण्यास वेळ लागतो.
- ब्राऊन राइस शिजण्यासाठी जास्त पाणी लागते.
- याशिवाय ब्राऊन राइस जास्त वेळ टिकत नाही, लगेचच खराब होतो.
- वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राइस एक उत्तम पर्याय आहे.
- ब्राऊन राइसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
दिवसभरात किती भात खावा?
WHO च्या मते, रोज 200-300 ग्रॅम भात खायला हवा. तुम्ही रोजच्या जेवणात या प्रमाणात भात खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde