चहा हे भारतीयांचे आवडते पेय आहे. सकाळी उठल्या उठल्या अनेकांना चहा हा हवाच असतो. बऱ्याच वेळेस सुस्ती आल्यावरही आळस घालवण्याकरता चहा पिण्याकडे लोकांचा कल असतो. या चहाचेही असंख्य प्रकार आहेत. आत्तापर्यंत तुम्ही ग्रीन टी, लेमन टी, जिंजर टी आणि इतर अनेक प्रकारचे चहा प्यायले असतील, पण तुम्ही कधी व्हाईट टी प्यायला आहे का ? पूर्वी या चहाचा भारतात ट्रेंड नव्हता, पण त्याच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे हा चहा भारतातही हळूहळू प्रसिद्ध होत आहे. नेमका व्हाइट टी म्हणजे आहे तरी काय ? आणि याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ? याविषयी आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
व्हाइट टी म्हणजे काय ?
खरंतर हा चहा कॅमेलिया वनस्पतीच्या पानांपासून बनवला जातो. या वनस्पतीच्या पांढऱ्या पानांपासून हा चहा तयार केला जातो. जे नवीन पानांपासून आणि त्यांच्या सभोवतालच्या पांढऱ्या तंतूपासून बनवले जाते. या चहाचा रंग हलका तपकिरी किंवा पांढरा असतो. त्यात टॅनिन, फ्लोराईड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यात कॅफिनचे प्रमाण खूपच कमी असते. यासाठीच हा चहा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
सूज कमी करते :
या चहामध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. हे शरीराला ऑक्सिडेशनच्या नुकसानापासून वाचवते आणि जळजळ काढून टाकण्यास मदत करते.
मधुमेह कमी करण्यास मदत करते :
या चहाचे नैसर्गिक गुणधर्म रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी ठेवतात आणि स्नायूंमध्ये देखील ग्लुकोजची पातळी वाढू देत नाहीत. यामुळेच ज्यांना मधुमेह आहे त्यांनी या चहाचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो.
त्वचेसाठी देखील उपयुक्त :
या चहामध्ये अँटी-एजिंग आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा मुलायम होते आणि चमकते. याशिवाय याच्या सेवनाने सुरकुत्याही कमी होतात.
इतका महाग का ?
खरंतर हा चहा बनवण्याची प्रक्रिया हे हा चहा महाग असण्याचं एक प्रमुख कारण आहे. या चहाच्या वनस्पतीची कापणी करण्याची प्रक्रिया इतर चहांपेक्षा वेगळी आहे. जरी व्हाइट टी हा ब्लॅक टी आणि ग्रीन टी सारख्याच वनस्पतींपासून बनत असला तरी व्हाइट टी ची लागवड करण्याची प्रक्रिया इतर चहाच्या तुलनेत अधिक महाग असते. या वनस्पतींची काळजी घेणे आणि ती वाढवणे या प्रक्रियेस वेळ लागतो. कारण या चहाच्या उत्पादनात फक्त लहान कळ्या आणि पाने वापरली जातात.
हेही वाचा : Kitchen Tips : पराठे लाटताना फाटतात? मग वापराव्यात या टिप्स
Edited By – Tanvi Gundaye