घरCORONA UPDATEWHO: Covid-19पासून बचाव करण्यासाठी 'या' वयोगटातील लहान मुलांनी मास्क घालणे अनिवार्य

WHO: Covid-19पासून बचाव करण्यासाठी ‘या’ वयोगटातील लहान मुलांनी मास्क घालणे अनिवार्य

Subscribe

लहान मुलांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी हेल्थ एक्सपर्टनी लहान मुलांना डबल मास्क घालण्याचा सल्ला

देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. ४ लाखांवर गेलेली देशाची रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे देशाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुढील काळात येणारी कोरोनाचा तीसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची तिसरी लाटही थोपवू शकतो. कोरोनापासून बचावासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे मास्क लावणे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून स्वत:चा आणि लहान मुलांचा बचाव करण्यासाठी मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या वयोगटातील लहान मुलांनी मास्क लावणे गरजेचे आहे याविषयी WHOने माहिती दिली आहे.(WHO: mandatory for children in this age group to wear masks to prevent Covid-19)

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, ५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लहान मुलांनी मास्क लावू नये. तर ६ वर्ष ते ११ वर्ष वयोगटातील आणि त्यापुढील सर्वांनी मास्क लावणे अनिवार्य आहे. यात पालकांनी लहान मुलांना मास्क लावण्यासाठी मदत करायला हवी.  लहान मुले मास्क घालण्यास नकार देत असतील त्यांना मास्क घालायला लावणे व त्यांना मास्कचे महत्त्व पटवून देणे हे पालकांचे काम असल्याचे WHO ने म्हटले आहे. आजच्या काळात लहान मुलांनी मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाचा जिवघेणा विषाणू लहान मुलांच्या नाकावाटे श्वसनातून शरीरात जाण्याचा सर्वाधिक धोका आहे. मास्क लावल्यास विषाणू लहान मुलांच्या शरीरात जाण्यापासून रोखता येईल आणि लहान मुलांचे संरक्षण होईल.

- Advertisement -

लहान मुलांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी हेल्थ एक्सपर्टनी लहान मुलांना डबल मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुलांना केवळ कार्टूनवाला एक मास्क  घालण्यास न देत आधी सर्जिकल मास्क आणि त्यावर कार्टून मास्क लावण्याचा सल्ला हेल्थ एक्सपर्ट्सनी दिला आहे. लहान मुलांनी नेहमी मास्क घालावे असे जर पालकांना वाटत असेल तर आधी पालकांनीही बाहेर पडताना,गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा. कारण लहान मुले नेहमीच मोठ्या माणासांचे अनुकरण करतात. त्यामुळे लहानमुलांआधी पालकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.


हेही वाचा – Coronavirus : देशात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नीति आयोगाने सांगितल्या ‘या’ उपाययोजना

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -