Friday, March 28, 2025
HomeमानिनीQueen Naganika : सातवाहनांचे राज्य सांभाळणारी नागनिका

Queen Naganika : सातवाहनांचे राज्य सांभाळणारी नागनिका

Subscribe

महाराष्ट्रात आजवर अनेक कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या आहेत. त्यातील एक स्त्री रत्न महाराष्ट्राने जगाला दिलेली पहिली महिला स्त्री प्रशासिका राणी नागनिका. नागनिकाची ओळख जगातील पहिली महिला शासक अशी केली जाते. आजच्या तिची गोष्टमधून जाणून घेऊयता राणी नागनिकाविषयी

इतिहासकारकांनुसार, चक्रवर्ती सम्राट अशोकानंतर सातवाहन घराण्याचे राज्य सुमारे 500 – 550 वर्ष टिकले. इ.स पूर्वीपासून सातवाहनांचे राज्य महाराष्ट्रातील जुन्नरच्या आसपासच्या परिसरावर होते असा उल्लेख आढळतो. जुन्नर येथील गुहांमध्ये जे काही शिलालेख सापडले आहेत. त्यावर या राणीचा उल्लेख आढळून आला आहे. या शिलालेखांमध्ये त्याकाळी रोमन साम्राज्यपर्यत त्यांचा व्यापार चालायचा असाही उल्लेख आढळतो. सातवाहन राजवंशाच्या पिढीची सम्राज्ञी राणी नागनिका होती. नागनिकाची ओळख जगातील पहिली महिला शासक अशी केली जाते.

राणी नागनिका ही महारथी त्रंकीयाची कन्या आणि सम्राट सिमुक सातवाहन यांची सून आणि महाराजा सातकर्णी यांची राणी होती. महाराजांचे तरुण वयातच निधन झाल्याने राणी नागनिकाच्या मुलांना गादीवर बसवावे लागले. पण, राणीची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राज्यातील प्रशासनाची सर्व सुत्रे नागनिकाला सांभाळावी लागली. महाराष्ट्र -कर्नाटक- आंध्रप्रदेशात त्यांची सत्ता आढळते. राणी नागनिकाने आपल्या राज्याच्या विकासासाठी खूप मोलाचा वाटा दिला आहे.
महाराणी नागनिका सातकर्णी एक कुशल राणी तर होतीच शिवाय एक असामान्य योद्धा देखील होती. यासह ती 49 युद्धकलांमध्ये पारंगत होती असेही सांगितले जाते. अरबस्तानापर्यत तिने आपले राज्य वाढवले होते. जगप्रसिद्ध इतिहासकार रॉबर्ट वॉलमन यांनी त्यांच्या World First Warrior या पुस्तकात या राणी नागनिका सतकर्णी यांनी आपले राज्य अरबस्तानापर्यत वाढवले असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय या राणीच्या तलवारीसमोर त्याकाळी 157 परदेशी आक्रमकांनी शरणागती पत्करली होती असा उल्लेख आढळतो.

आपल्या नावाची नाणी बनवणारी राणी –

जवळपास 2000 वर्षापूर्वी आपल्या नावाची नाणी बनवणारी राणी अशी राणी नागनिकाची संपूर्ण जगात ख्याती आहे. जगात पहिल्यांदा कोणत्या स्त्रीच्या नावाने नाणी तयार करण्यात आली असे शोधल्यास त्याचे उत्तर इतिहासकार राणी नागनिका सतकर्णी असे देण्यात येते.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini