घरCORONA UPDATECovid 19चा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी मास्क का आणि कसा प्रभावी आहे?

Covid 19चा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी मास्क का आणि कसा प्रभावी आहे?

Subscribe

ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची सर्वात जास्त शक्यता असते अशा उच्च जोखीम असलेल्या ठिकाणी उच्च पातळीचे, सर्वात जास्त प्रभावी असलेले N95 किंवा FFP2 सारखे मास्क वापरणे गरजेचे

कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मास्क घालणे अत्यंत गरजेचे असल्याचे कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आपल्याला सांगण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थिती कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क घातल्याने वाढणारी जोखीम कमी होते. त्यामुळे जगभरात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य आहे. Covid 19चा प्रसार मर्यादित करण्यासाठी मास्क का आणि कसा प्रभावी ठरतो जाणून घ्या. जर्मनीच्या मेंझमधील मँक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्रीच्या संशोधकांनी एक अभ्यास केला त्यात त्यांनी असे दिसून आले की, बहुतेक वेळा वातावरण आणि कोणत्याही परिस्थितीत साध्या सर्जिकल मास्कमुळे देखिल कोरोनाचे संक्रमण कमी होण्यासाठी मदत होते. कोरोना हवेतूनही संक्रमित होतो हे देखील अनेक वेळा सिद्ध झाले आहे. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा श्वासोच्छावासाच्या कणांमध्ये थोड्या भागात व्हायरस असतात. त्यामुळे वातावरणात आणि व्हायरसचा संपर्क असलेल्या परिस्थितीतही साधा सर्जिकल मास्क अधिक प्रभावी ठरतो,असे अभ्यासकांनी सांगितले. (Why and how is the mask effective in limiting the spread of Covid 19?)

कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात संक्रमित होण्याची शक्यता जिथे असते अशा ठिकाणी म्हणजेच रुग्णालयात, दाट वस्ती असलेल्या ठिकाणी, वैद्यकीय केंद्र अशा ठिकाणी कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. अशा उच्च जोखीम असलेल्या ठिकाणी उच्च पातळीचे, सर्वात जास्त प्रभावी असलेले N95 किंवा FFP2 सारखे मास्क वापरणे गरजेचे आहे,असेही अभ्यासकांनी सांगितले आहे.

- Advertisement -

चॅरिटा रिसर्च एरिया न्यूमोलॉजीचे प्रमुख ख्रिश्चन विट यांनी असे म्हटले आहे की, मास्क हा कोरोना संसर्गविरुद्ध संरक्षणात्मक उपाय आहे. लसीकरण केलेल्या लोकांसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. कोरोनाच्या नव्या म्युटंटच्या विरोधात लढण्यासाठी आणि स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. सध्या अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञ देखील कोरोनापासून आपले संरक्षण करण्यासाठी डबल मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. एक कापडी मास्क आणि एक सर्जिकल मास्क असे दोन मास्क एकत्र करुन वापरावे. त्याचप्रमाणे घराबाहेर पडताना तीन पदरी मास्क वापरणेही सुरक्षित ठरु शकते असे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Corona : कोरोनाची सौम्य लक्षणे अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी मदत करतात- संशोधन

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -