Wednesday, December 4, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीReligiousMarriage rituals : लग्नाआधी वधू- वरांना का हळद लावली जाते?

Marriage rituals : लग्नाआधी वधू- वरांना का हळद लावली जाते?

Subscribe

दिवाळीनंतर लग्नसराईचे दिवस सुरू होतात. लग्नात अनेक विधी पार पडतात. लग्नातच नाही तर लग्नाआधीही काही विधी , प्रथा आपल्याकडे जपल्या जातात. त्यातील एक म्हणजे लग्नाआधीचा हळदी समारंभ. मोठ्या उत्साहात लग्न समारंभातील हळदीचा कार्यक्रम केला जातो. यात वधू – वरांना हळद लावली जाते. हळदीचा हा कार्यक्रम अतिशय शुभ मानला जातो. हळदीमध्ये तेल आणि पाणी मिक्स करून त्याची पेस्ट वधू-वरांना लावली जाते. असे मानले जाते की, लग्नापूर्वी हळद लावल्याने जोडप्याला सुखी-जीवनाचा आशिर्वाद मिळतो. पण, लग्नाआधीच का वधू- वरांना का हळद लावली जाते? हे तुम्हाला माहीत आहे क? पाहूयात, यामागील काही सामान्य कारणे,

याची काही सामान्य कारणे पाहूयात,

- Advertisement -
  • अनेकांच्या मते, लग्नाआधी वधू-वरांना हळद लावल्याने नकारात्मक शक्तीपासून त्यांचा बचाव होतो. त्यामुळे हळदी सभारंभानंतर लग्नाच्या मुहूर्तापर्यत वधू- वरांना घराबाहेर पडू दिले जात नाही.
  • हळदीचा रंग पिवळा असतो. पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो. खरं तर, पिवळा रंग समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे केवळ हळदच नाही तर पिवळे कपडे देखील घालण्याला प्राधान्य दिले जाते.
  • हळदीला आयुर्वेदानुसार, अनेक आजारांवरील रामबाण उपाय मानला जातो. त्यामुळे पूर्वी, जेव्हा कॉस्मॅटिक प्रॉडक्ट, पार्लर नव्हते. तेव्हा त्वचेचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी हळदीचा वापर केला जायचा. त्यामुळे लग्नाच्या दिवशी वधू- वरांचा चेहरा तेजस्वी दिसण्यासाठी हळदीचा वापर केला जायचा. हळदीमुळे त्वचेचा रंग सुधारून चेहऱ्यावर तेज यायचे.
  • अॅटीसेप्टीक म्हणून हळदीकडे पाहीले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे लग्नाआधी वधु- वरांची त्वचा डागरहीत राहते.
  • लग्नाआधी वधू-वरांना थोडा का होईना ताणतणाव असतोच. ताणतणावामुळे शारीरिक व्याधी तर सुरू होतातच शिवाय त्वचेवरही याचा परिणाम होतो. अशावेळी हळदीचे लेपन लावणे फायदेशीर ठरते. हळदीमध्ये कर्क्युमिन, अॅटी-ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो आणि स्ट्रेसही कमी होतो.
  • हळद शरीराला शुद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरते. एक्सफोलिएटिंग एजंट म्हणून हळदीचा वापर केला जातो. हळदीच्या समारंभानंतर जेव्हा वधू- वरांना आंघोळ घालतात तेव्हा त्वचेवरील मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि त्वचाही डिटॉक्स होते.

 

 

- Advertisement -

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini