शिंका येणे ही सामान्य गोष्ट आहे. सर्दी-खोकल्या झाल्यावर शिंका येणे सामान्य बाब आहे. पण, वारंवार शिंका आल्यावर नकोसे होते. काहींना सकाळी उठल्यावर शिंका येतात. सलग 7 ते 8 शिंका येतात आणि आपोआप थांबतात. पण, सकाळी उठल्यावरचं शिंका का येतात? असा प्रश्न कधी मनात आला आहे का? सकाळी उठल्यावर सतत शिंका येण्याला काही कारणे असू शकते. चला तर मग जाणून घेऊयात, यामागील कारणे,
शिंका येण्याची कारणे –
- सकाळी शिंका येण्याला ऍलर्जीचं कारण असू शकते. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे शिंका येऊ शकतात. वाढते प्रदुषण, धुळ, माती, प्राण्यांचे केस यामुळे सकाळी शिंका येऊ शकतात.
- जर तुमची झोपण्याची खोली एअर कंडीशनरमुळे थंड आणि कोरडी पडली असेल तर नाकात कोरडेपणा वाढतो. सकाळी शिंक येण्यामागे हे कारण असू शकते.
- सायनसमुळे सकाळी उठल्यावर शिंका येतात. सायनसमध्ये नाकातून श्लेष्मा बाहेर पडतो आणि नाकात वेदना जाणवतात. जे, खूपच त्रासदायक असते.
- काहीवेळा तेजस्वी प्रकाश किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर शिंका सुरू होतात. या परिस्थितीला फोटिक स्नीझ रिफ्लेक्स असे म्हणतात. फोटिक स्नीझ रिफ्लेक्स आजार जगावेगळा नसून ही एक सामान्य समस्या आहे.
- तुम्ही सकाळी अचानक थंड किंवा गरम हवेच्या संपर्कात आल्यानेही शिंका येऊ शकतात.
- झोपल्यावर शरीराची रोगप्रतिकारशक्ती बदलते. ज्यामुळे शिंका येतात. हे पूर्णत: नैसर्गिक असून काळजी करण्याचे कारण नसते.
अशी करा सुटका –
- अन्नामध्ये सैंधव मीठ वापरावे.
- कोमट पाणी प्यावे.
- मधात आवळा पावडर मिक्स करुन दोनदा त्याचे सेवन करावे.
- पुदिन्यांच्या पानांचा चहा प्यावा.
- कोमट पाण्यात हळद आणि जाड मीठ टाकून प्यावे.
हेही पाहा –