थंडे थंडे पानी से नहाना चाहीये, गाना आये या ना नहाना चाहीए.. हे गाणं गुणगुणत कित्येक भारतीयांना आंघोळ करण्याची सवय असते. कोणी थंडगार पाण्याने तर कोणी गरम पाण्याने आंघोळ करते. पण, आपल्या देशात सकाळी उठल्यावर आंघोळ करणं ही अंगवळणी पडलेली सवय आहे. त्याशिवाय कोणाचा दिवस सुरू होत नाही. पण, आता आम्ही तुम्हाला असं सांगितले की, काही देशांमध्ये आंघोळ रात्री केली जाते तर.. या देशांमध्ये रात्रीचे आंघोळ करणे शरीरासाठी फायद्याचे मानले जाते. चीन-जपानमध्ये सकाळऐवजी रात्री आंघोळ करण्याची पद्धत आहे. पण, तज्ञांच्या मते आंघोळीच्यावेळेबाबत काय मत आहे, त्यांच्यामते आंघोळीसाठी योग्य वेळ कोणती जाणून घेऊयात,
खरं तर, भारतात फार पूर्वीपासून आंघोळीसाठी सकाळची वेळ योग्य मानली जाते, त्याचप्रमाणे चीन-जपानमध्ये प्राचीन काळापासून रात्री आंघोळ करण्याची सवय आहे. त्या ठिकाणी असे मानले जाते की, रात्री आंघोळ केल्याने दिवसभर शरीरावर साचलेली विषारी द्रव्ये, घटक, घाण निघून जाते. याशिवाय रात्री आंघोळ केल्याने रात्री चांगली झोपही लागते. खरं तर एका विशिष्ट पद्धतीनुसार जपानमध्ये आंघोळ करण्यात येते. जपानी आंघोळ संस्कृतीमध्ये ऑनसेन (हॉट स्प्रिंग्ज) आणि ऑफरो (बाथटब) यांचा समावेश आहे. आंघोळीच्या टबमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरीर पूर्णपणे स्वच्छ केलं जाते. टबमधील पाणी सहसा उबदार असते. त्यामुळे दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री आंघोळ केल्याने व्यक्तीला आराम मिळतो. जपानी लोक शांत झोपेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी रात्री आंघोळ करतात. त्यांच्या मते, रात्री आंघोळ केल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध होते.
जपानची संस्कृती –
जपानी लोकांची आंघोळ आणि त्यांच्या कार्यसंस्कृतीचा फार जवळचा संबंध आहे. बऱ्याच जपानी कामगारांचे कामाचे तास जास्त आणि तणावपूर्ण असतात. त्यामुळे वेळ न पाहता रात्री उशिरापर्यत काम केले जाते. अशावेळी रात्री झोपायच्या आधी आंघोळीची वेळ म्हणजे काम संपल्याचे आणि विश्रांती घेण्याची सुचना देते, असे मानले जायचे. त्यामुळे चीन-जपानमध्ये रात्रीची आंघोळ करणे योग्य मानले जाते.
तज्ञांच्या मते योग्य काय ?
तज्ञांच्या मते, रात्री झोपण्याआधी आंघोळ करणे योग्य मानले जाते. कारण दिवसभर आपण मेहनत करतो, बाहेर असतो. अशावेळी झोपण्याआधी शरीर फ्रेश होण्यासाठी आंघोळ करणे फायद्याचे ठरेल असे तज्ञ सांगतात. तुमच्या रात्री आंघोळ करण्याच्या सवयीमुळे दिवसभराचा थकवा दूर होण्यासाठी मदत होते, याशिवाय झोपही लागते. रिसर्चनुसार, रात्री झोपण्याआधी कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शांत झोप लागते. यासह जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करता तेव्हा दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटते. काम करताना कोणत्याही प्रकारचा कंटाळा येत नाही. एकदंरच, तज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी तुम्ही आंघोळ करायला हवी, असे सांगितले जाते.
हेही पाहा –