घरताज्या घडामोडीMakar Sankranti 2022: म्हणून मकर संक्रांतीला घालतात काळ्या रंगाचे कपडे

Makar Sankranti 2022: म्हणून मकर संक्रांतीला घालतात काळ्या रंगाचे कपडे

Subscribe

जाणून घ्या मकरसंक्रांतीला का करतात काळ्या रंगाचे कपडे परिधान.

इंग्रजी नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यादिवशी राग, रुसवा विसरुन ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’, असं म्हटलं जातं. हा सण खास करुन नववधू आणि बाळांसाठी उत्साहाचा सण असतो. यादिवशी नववधू हलव्याचे दागिने परिधान करते. तसेच बाळाला देखील सजवले जाते. पण, या सणाची खासियत म्हणजे यादिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो. मात्र, तरी देखील यादिवशी काळ्या रंगाचे कपडे का परिधान केले जातात? असा अनेकांना प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊया मकरसंक्रांतीला का करतात काळ्या रंगाचे कपडे परिधान.

यासाठी परिधान करतात काळे कपडे

मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे. ज्यादिवशी काळे कपडे परिधान करुन सण साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरुष काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान करतात. याच कारण म्हणजे काळी वस्त्रे उष्णता शोशून घेतात, म्हणून काळ्या साड्या, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या दिवसात बाजारात उपलब्ध होतात. सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत असते. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायणाला प्रारंभ होतो.

- Advertisement -

अशी आहे संक्रांतीची पुराणातील कथा

श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी आणि छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता.


हेही वाचा – Makar Sankranti 2021: असे पुजले जाते ‘सुगड’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -