थंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घरातील उबदार कपडे शरीर गरम ठेवण्यासाठी वापरले जात आहे. पण, इतक्या थंडीतही पुरूष मंडळींना मात्र फॅन हवा आहे. काय पटलं ना? तुमच्याही घरी अशीच परिस्थिती आहे का? वाढत्या थंडीत फॅन लावणे आणि बंद करण्यावरून बाचाबाची होत आहे. एकीकडे पुरुष मंडळीना फॅन हवा आहे तर महिलांना नको आहे. हा सर्व विनोदाचा भाग असला तरी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त थंडी वाजण्यामागे काही कारणे आहेत.
मेटॅबॉलिझम रेट
स्त्रियांच्या मेटॅबॉलिझम रेटवर थंडी वाजणे अवलंबून असते. शरीरातील मेटॅबॉलिजममुळे शरीरात उर्जेचे उत्पादन होते. डॉक्टरांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांचा मेटॅबॉलिक रेट कमी असतो म्हणजेच मेटॅबॉलिझम क्रियेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे महिलांना जास्त थंडी वाजते.
स्नायू
शरारीचे स्नायू हे उष्णता निर्मितीचे मुख्य स्त्रोत आहेत. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा शरीराचे वस्तुमान कमी असते. याउलट पुरुषांच्या शरीरावर जास्त स्नायु असल्यामुळे त्यांना थंडी जास्त जाणवत नाही तर महिलांच्या शरीरावर कमी स्नायू असल्यामुळे थंडी जास्त जाणवते.
हार्मोनल इफेक्टस
महिलांना जास्त थंडी लागण्याचे तिसरे कारण म्हणजे हार्मोनल इफेक्टस आहे. महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन जास्त असतो. प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे उष्णता कमी निर्माण होते आणि थंडी जास्त लागते.
थंडी वाजणे ही एक नैसर्गिक बाब आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात थंडी वाजत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जास्त थंडी वाजणे हे एखाद्या आजाराचे कारण असू शकते. त्यामुळे लवकरात लवकर तज्ञांशी बोलून उपचार करून घ्यावेत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde