Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthभूक लागल्यावर राग का येतो?

भूक लागल्यावर राग का येतो?

Subscribe

अनियमित आणि अयोग्य भूक या वेळी आपल्याला जर का काय खायला मिळाले नाही तर आपला राग वाढतो आणि अशा वेळी आपल्याला काहीच सुचत नाही.

भूक लागणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण भूक लागल्यावर राग का येतो याबद्दल आपल्याला माहित नसतं. प्रत्येकाची भूक ही वेगवेगळी असते. तसेच अनियमित आणि अयोग्य भूक या वेळी आपल्याला जर का काय खायला मिळाले नाही तर आपला राग वाढतो आणि अशा वेळी आपल्याला काहीच सुचत नाही. अशातच भूक लागली की काही करावेसे वाटत नाही. फार पूर्वीपासून भूकेवर एक म्हण आहे ती म्हणजे आधी पोटोबा आणि मग विठोबा… आणि ही म्हण नेहमी आपल्या दैनंदिन आयुष्यात लागू पडते. अशावेळी काय करावे आणि कशा पद्धतीने भूकेवर उपाय करायचा हे आता आपण जाणून घेणार आहोत.

Hangry Effects on Your Body | Eat This Not That

भूक लागल्यावर राग का येतो?

  • जेव्हा तुम्ही बराच काळ उपाशी राहता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर कमी होत असते. आणि त्यानंतर तुमचे शरीर ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी अॅड्रेनालाईन नावाचे हार्मोन शरीरात सोडतात.
  • ज्यामध्ये तुमचे शरीर तुम्हाला अनेक शाररिक समस्यांना सामना करण्यासाठी तयार करते.
  • पण जेव्हा शरीराला कोणतीही समस्या नसते तेव्हा तुम्ही त्या अतिरिक्त उर्जेने चिडचिड करता आणि रागावता.
  • यावेळी शरीर कोर्टिसोल हार्मोन सोडतो. ज्यामुळे शरीरामध्ये सतत तणावाची भावना येते.
  • अशावेळी जर का तुम्ही पोटभर खाल्ले तर ते अन्न शरीरात व्यवस्थित पचते,आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.
  • तसेच जे अन्न आपण सेवन केले आहे यामधून अनेक पोषक तत्त्वे रक्तापर्यंत पोहोचतात आणि शरीराच्या प्रत्येक भागात मिक्स होतात.
  • यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते आणि शरीराला देखील आराम मिळतो.

अशाप्रकारे भुकेवरचा राग करा कंट्रोल-

  • भूक लागताच त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी संतुलित आहार घ्या.
  • योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी अन्न सेवन केल्यावर तुमच्या मनःस्थितीवर, वागणुकीवर आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
  • जास्त फायबर असलेले पदार्थ खा. त्यामुळे लवकर भूक लागणार नाही.

हेही वाचा : ‘हे’ पदार्थ सतत गरम केल्यास होतात विषारी

- Advertisment -

Manini