आपल्या चेहऱ्यामुळे आपल्याला ओळख मिळते. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. चेहऱ्याची काळजी घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नियमित फेस मसाज करणे. चेहऱ्याच्या त्वचेला मसाज केल्याने त्वचेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यासह त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. चला तर मग जाणून घेऊयात, फेस मसाज का करावा
फेस मसाजचे फायदे –
- दररोज काही वेळ फेस मसाज केल्याने बल्ड सर्कुलेशन सुधारते. ब्लड सर्कुलेशन सुरळीत झाल्याने डेड स्किन निघते आणि चेहरा उजळण्यास सुरूवात होते. त्वचा मुलायम, चमकदार होते.
- चेहऱ्याच्या मसाजमुळे एकूणच आरोग्यास फायदा होतो. मन आणि शरीर शांत होते. ज्यामुळे ताण-तणाव, चिंता कमी होते.
- दररोज काही वेळ फेस मसाज केल्याने त्वचेचा पोत, कोलेजनची पातळी आणि त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी फायदा होतो.
- फेस मसाज केल्याने सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे वृद्धत्वांची चिन्हे कमी होतात.
- फेस मसाजमुळे त्वचा आतून डिटॉक्सिफाय होते आणि त्वचेवरील डाग, मुरुमांची समस्या कमी होतात.
फेस मसाजसाठी कोणते तेल वापरावे-
फेस मसाज करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, बदाम तेल, कॅमोमाइल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा. या तेलांनी फेस मसाज केल्याने त्वचेला फायदेच फायदे होतात. मसाज केल्यावर त्वचेवर मॉइश्चरायजर लावावे. चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये वरच्या बाजूस करावा आणि हलक्या हातांनी करावा, मसाज करताना प्रेशर देऊ नये.
किती वेळ करावा-
- आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा फेस मसाज करू शकता.
- रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मसाज करणे अधिक लाभदायी मानले जाते.
हेही पाहा –