प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र असतोच. मित्रामुळे आयुष्य का जगावे याचे उत्तर मिळते. मैत्रीत वय, जातपात, श्रींमत- गरिब असे काहीच पाहिले जात नाही. याच मैत्रीपायी दरवर्षी आ्ॅगस्ट महिन्यात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. भारतासह अनेक देशात विविध पद्धतीने सेलिब्रेट करण्यात केला जातो. जसे की, कोणी ग्रुपने फिरायला जाते तर कोणी पार्टीचे नियोजन केले जाते. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. पण, आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, यामागचे कारण तुम्हाला माहित आहे काय़? जाणून घेऊयात,
असे म्हटले जाते की, 1935 मध्ये अमेरिकेत आॅगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी या हत्येमागे अमेरिकन सरकारचा हात होता असे म्हटले जाते होते. ज्या व्यकीची हत्या करण्यात आली त्या व्यक्तीचा एक जवळचा मित्र होता. आपल्या मित्राचा खून झाला हे कळताच त्या व्यक्तीनेही आत्महत्या केली. मैत्रीचे हे रूप पाहून अमेरिकन सरकारने आॅगस्ट महिन्याच्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला.
हळूहळू करून हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. भारतासह अनेक देश आ्ॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करू लागले. यंदा 4 आॅगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी तरूणांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. दरवर्षी एक खास थीम असते. यावर्षी Embracing Diversity, Fostering Unity अशी थीम आहे.
Edited By – Chaitali Shinde