जुन्या काळात मुली मुलांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्यास घाबरायच्या. यासाठी प्रत्येकाचे तर्क वितर्क सुद्धा असतील. मात्र अशी काही कारणे आहेत त्याबद्दल त्या कधीच खुल्यापणे बोलत नाहीत. यामागे नक्की कारणे आहेत याच बद्दल जाणून घेऊयात.
काही अभ्यासातील आकडेवारी असे दाखवते की, महिलांना पुरुषांनीच प्रपोज केलेले आवडते. त्यांना असे वाटते की, मुलाने त्यांना समोरुन विचारले पाहिजे. जेणेकरुन तुम्ही त्याची प्राथमिकता आहात की नाही हे त्या पाहत असतात. त्यामुळेच मुली आधी समोरुन प्रपोज करत नाहीत.
या व्यतिरिक्त प्रेमात रिजेक्शनची भीती वाटत असल्याने ही त्या स्वत:हून कधीच मुलांना प्रपोज करत नाहीत. त्यांच्यासाठी नकार हा एखाद्या दु:खासारखा असतो आणि त्यामधून बाहेर पडणे त्यांच्यासाठी मुश्किल असते. त्याचसोबत त्यांना सेल्फ वर्थ कमी झाल्यासारखे ही वाटते.
मुली प्रपोज करण्यापासून दूर राहतात कारण त्यांना पार्टनर सोडून जाईल अशी सतत भीती वाटत राहते. त्याचसोबत समोरुन प्रपोज केल्यानंतर मुलगा आपला आदर करेल की नाही अशी ही चिंता सतावत राहते.
ज्या मुली आपल्या आवडीच्या मुलांना प्रपोज करतात त्यांना बोल्ड असा बहुतांशजण टॅग लावतात. खरंतर असा मुलींबद्दल विचार करणे त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या मुलांना हिंट देऊन त्यांनी समोरुन प्रपोज करावे अशी अपेक्षा करत असतात.
हेही वाचा- तुमच्यात ‘हे’ गुण असतील तरच मिळतो सन्मान