लाल रंग प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब दिलं जातं. हजारो वर्षांपासून प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाच्या फुलाकडे पाहिलं जाते. लाल गुलाब पाहताच कोणाच्याही मनात प्रेम, आपुलकी, रोमान्स जागृत होतो. लाल गुलाबाचं फूल मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब देऊ शकते किंवा एखाद्या जोडप्यामध्ये भांडण झाले असेल तर भांडण मिटवण्यासाठी नक्कीच कामी येते. पण, प्रेमाच्या या दुनियेत गुलाबाला अढळ स्थान आलं कुठून? प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबच का दिलं जात? लाल गुलाब आणि प्रेमाचं नातं नक्की काय आहे? आता लवकरच व्हॅलेंटाइन्स वीक सुरू होणार आहे. तुम्ही सुद्धा गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करण्याच्या विचारात असाल तर लाल गुलाब आणि प्रेमाचा संबंध नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचावा.
प्रेमाच्या दुनियेत असा झाला गुलाबाचा प्रवेश –
ग्रीक पौराणिक कथांमध्ये गुलाबाच्या फुलाबद्दल एक कथा सांगण्यात येते. या कथेनुसार, ग्रीक देवी एफ्रोडाइटला प्रेम, लैगिंकता आणि सौंदर्य यांचे प्रतीक म्हटले आहे. असे सांगितले जाते की, एफ्रोडाइटचे सौंदर्य इतके जादुई होते की, ती ज्या ठिकाणी जायची त्या ठिकाणी गुलाब उगवायचे. त्यामुळे लाल गुलाब हे प्रेम, शुभेच्छांचे प्रतीक मानले जाऊ लागले.
गुलाबाशी संबंधित आणखी एक कथा सांगितली जाते. ही कथा ग्रीक देव ऍडोनिसशी संबंधित आहे. एकदा शिकार करताना रानडुकराने ऍडोनिस यांचा बळी घेतला होता, असे म्हणतात. ज्या ठिकाणी ऍडोनिस यांचा मृत्यु झाला, त्या ठिकाणी पांढरे गुलाब होते. हे पांढरे गुलाब ऍडोनिस यांच्या रक्ताने लाल झाले. तेव्हापासून लाल गुलाब त्याग आणि उत्कटतेचे प्रतीक मानले जाऊ लागले. अशाप्रकारे, प्रेमाच्या दुनियेत गुलाबाचा प्रवेश झाला.
आरोग्यासाठी गुलाब फायदेशीर –
केवळ प्रेमचं नाही तर मानसिक आरोग्यासाठी गुलाब फायदेशीर असते. एका संशोधनानुसार, गुलाब पाहिल्यावर मानवी मेंदूच्या त्या भागावर परिणाम करतो, जेथून मनाला शांतता मिळते. गुलाबाचा सुगंध केवळ स्ट्रेस कमी करत नाही तर गुलाब पाहिल्यावर शांत झोप लागते. गुलाब पदार्थांमध्ये वापरले जाते.
हेही पाहा –