Thursday, April 25, 2024
घरमानिनीKitchenNarli Bhat Recipe : नारळी पौर्णिमेला का केला जातो नारळी भात? वाचा रेसिपी

Narli Bhat Recipe : नारळी पौर्णिमेला का केला जातो नारळी भात? वाचा रेसिपी

Subscribe

नारळी पोर्णिमेला कोळी बांधव परंपरेनुसार समुद्राला नारळ अर्पण करतात. या सणानिमित्त नारळापासून बनणारे काही खास पदार्थ बनवले जातात. कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनविण्यात येतात. तर आज आपण नारळी भात कसा बनवला जातो, याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य :

  • 3/4 कप तांदूळ
  • दिड कप पाणी
  • 2 चमचा साजूक तूप
  • 2-3 लवंगा
  • 1/4 चमचा वेलची पूड
  • 1 कप किसलेला गूळ
  • 1 कप किसलेला नारळ
  • 8-10 काजू

कृती :

Celebrating Rakhi, Narali Poornima With Coconut Sweets | Zee Zest

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम तांदूळ दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवा.
  • आता एका भांड्यात २ चमचे तूप गरम करून, त्यामध्ये लवंग घालून काही सेकंद परतून घ्या.
  • आता त्यामध्ये तांदूळ घालून २ ते ३ मिनिट मध्यम आचेवर परतून घ्या.
  • त्याचवेळी दुसरीकडे दिड कप पाणी गरम करून घ्या.
  • आता हे गरम पाणी परतलेल्या तांदळात घाला. आणि गॅस मध्यम आचेवर ठेऊन भात शिजवून घ्या.
  • भात शिजला की तो एका ताटामध्ये काडून घ्या. भात गार करा
  • एकीकडे किसलेला नारळ आणि गूळ एकत्र करा. आता त्यात हलक्या हाताने भात मिक्स करा.
  • आता एका भांड्यामध्ये तूप घालून भात, नारळ आणि गूळाचे मिश्रण परता आणि त्यात वेलची पावडर, १०-१५ चांगले शिजवा.
  • आता गॅस बंद करून त्यावर काजू, बदाम घालून सजवा.
  • तूप घालून सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :

RakshaBandhan special : रक्षाबंधनला बनवा थंडगार केसर फिरनी

- Advertisment -

Manini