Tuesday, June 6, 2023
घर मानिनी जाणून घ्या! सोन्याच्या दागिन्यात हॉलमार्क का आहे जरुरी?

जाणून घ्या! सोन्याच्या दागिन्यात हॉलमार्क का आहे जरुरी?

Subscribe

नव्या नियमानुसार तुम्हाला हॉलमार्किंगेचच दागिने घेणे बंधनकारक आहे. जर तुमच्या दागिन्यावर हॉलमार्किंग नसेल तर सोनारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

आपण प्रत्येकजण आपल्या कमाईतील जमापुंजी एकत्र करून सोन्या-चांदीचे दागिने बनवत असतो. सोन्यातील गुंतवणूक सर्वोत्तम गुंतवणूक समजली जाते. मात्र, सोने खरेदी करताना काळजी घ्यावी लागते, अन्यथा ग्राहकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. सध्या सगळीकडे सण-उत्सव जोरात सुरू आहेत. सण-उत्सवांत आपण मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतो. अशावेळी सोने खरेदी कशी करावी, अस्सल सोनं कसं ओळखावं याची माहिती घेणार आहोत. (Why is hallmark necessary in gold jewelry?)

हेही वाचा – 22 की 23 ऑक्टोबर नक्की कधी आहे धनत्रयोदशी? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

- Advertisement -

सोन्याचे कोणतेही दागिने विकत घेताना सर्वात आधी त्यावर हॉलमार्किंग (Hallmark) आहे की नाही याची तपासणी करून घ्या. तरच तुम्हाला त्या दागिन्यातील सोन्याची शुद्धता कळू शकणार आहे. २३ जून २०२१ च्या नियमानुसार, सोनार आता फक्त हॉलमार्किंगचेच दागिने विकू शकणार आहे. हॉलमार्किंगशिवाय असलेले दागिने विकल्यास सोनाराला कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हॉलमार्किंगेच दागिनेच का? त्यांचं वैशिष्ट्य काय? आणि मुळात हॉलमार्किंग म्हणजे काय?

तर, हॉलमार्किंग म्हणजे दागिन्यातील सोन्याची शुद्धता सांगणारा क्रमांक. दागिन्यात किती टक्के सोने वापरले आहे हे हॉलमार्किंगमुळे कळतं. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही. हॉलमार्किंगवर दागिना किती कॅरेटचा आहे हे चिन्हांकित केलं जातं. १४ कॅरेटचा दागिना असेल तर त्यावर ५८५ क्रमांक चिन्हांकित केलेलं असतं. म्हणजे १४ कॅरेटच्या दागिन्यात फक्त ५८.५ टक्केच सोनं असतं. १८ कॅरेटच्या दागिन्यासाठी ७५० क्रमांक लिहिलेला असतो. म्हणजे, १८  कॅरेटच्या दागिन्यामध्ये ७५ टक्के सोनं असतं. तर, २२ कॅरेटच्या दागिन्यामध्ये ९१६ क्रमांक चिन्हांकित केलेला असतो. याचा अर्थ २२ कॅरेटच्या दागिन्यात ९१ टक्के सोनं असतं. त्यामुळे दागिने खरेदी करताना त्यावर नेमका किती आकडा लिहिला आहे यावरून दागिन्याची शुद्धता आणि कॅरेट समजू शकतं.

- Advertisement -

हेही वाचा दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; चमकेल तुमचे भाग्य

नव्या नियमानुसार तुम्हाला हॉलमार्किंगेचच दागिने घेणे बंधनकारक आहे. जर तुमच्या दागिन्यावर हॉलमार्किंग नसेल तर सोनारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग नाही? म्हणजे तुमचे ते दागिने खोटे ठरणार की काय? तर मंडळी घाबरू नका. ते दागिनेही खरेच आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्या दागिन्यांवरही तुम्ही हॉलमार्किंग करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला सोनाराला शुल्क द्यावं लागणार आहे. ठराविक शुल्क भरल्यानंतर सोनार तुम्हाला तुमच्या जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करून देऊ शकतो. तसंच, हॉलमार्क न करताच तुम्ही ते दागिने घरी ठेवले तरीही तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. शिवाय, या जुन्या हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांपासून तुम्ही सहज कर्जसुद्धा घेऊ शकता. फक्त नव्याने कर्ज घेताना त्यावर हॉलमार्क आहे की नाही एकदा नक्की तपासून घ्या. तर, मंडळी येत्या दिवाळीत छान शॉपिंग करा. आणि दागिने खऱेदी करताना आम्ही सांगितलेल्या टीप्स लक्षात ठेवा.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -

Manini