देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होलिका दहनाच्या आधी जगाचा निर्माता श्री हरी विष्णू आणि अग्निदेव यांची पूजा केली जाते. होळीच्या दिवशी नैवेद्यात हमखास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. असे म्हणतात की, यामागे शास्त्र असते. सुट्टी असल्याने मस्तपैंकी पुरणपोळीवर ताव मारण्यात येतो. मात्र, होळीच्याच दिवशी का बनवली जाते पुरणपोळी? इतर सणाला याचे महत्त्व का नसते? कदाचित याची उत्तरे तुम्हाला माहित मसतील. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला होळीलाच का पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो, यामागील शास्त्र काय? सांगणार आहोत.
यंदाचा शुभ मुहूर्त –
यंदा हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याची पौर्णिमा गुरुवार 13 मार्च रोजी सकाळी 10.35 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 14 मार्च रोजी दुपारी 12.23 वाजता संपेल. तर होलिकाचा शुभ मुहूर्त 13 मार्च रोजी रात्री 11.26 ते दुपारी 12.30 पर्यंत असेल. अशा स्थितीत होलिरा दहनाची एकूण वेळ 1 तास 4 मिनिटे असेल.
पुरणपोळीचा का नैवेद्य दाखवला जातो?
पौराणिक कथेनुसार, ढुंढा नावाची एक राक्षसीण होती. ही ढुंढा राक्षसीण मुलांचा जीव घ्यायची. तिच्या या मानसिक आणि शारीरिक त्रासाला सर्वचजण कंटाळले होते. अखेर राक्षसीणीच्या त्रासाला वैतागून गावातील सर्व पुरुषांनी एके दिवशी सूर्यास्ताच्यावेळी आपापल्या घरून पाच गोवऱ्या, पाच लाकडे आणली आणि ती गोल रचून पेटवली. यानंतर राक्षसीणीच्या शोधात सर्वत्र बोंबा मारत, शिव्या देत हिंडू लागले. दुसरीकडे हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने शेतातून गहू आणि हरभऱ्याची डाळ पिकवण्यात आली होती. त्यामुळे घरा-घरात स्त्रियांनी पुरणपोळीचा बेत आखला होता. असे म्हणतात की, पुरणपोळीवर तूप, दूध, आमटी, भात, भाजी असा नैवैद्य केळीच्या पानावर अग्नीसमोर दाखवण्यात आला. तेथे जमलेल्या पुरुषांनी अग्निदेवाला तीन प्रदक्षिणा मारल्या आणि हे सर्व चित्र पाहून राक्षसीणीच्या मनात आपल्याला लोक अग्नीत भस्म टाकून मारतील विचार आला आणि तीने तिथून पळ काढला. तेव्हापासून फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तेव्हापासून होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवली जाते आणि होळी रे होळी पुरणाची पोळी… असे म्हटले जाते.
हेही पाहा –