Saturday, February 8, 2025
HomeमानिनीHealthLaughing : खळखळून हसण्याचे आहेत फायदे

Laughing : खळखळून हसण्याचे आहेत फायदे

Subscribe

निरोगी आरोग्यासाठी अन्न, पाणी, व्यायाम यासह खळूखळून हसणे महत्वाचे आहे. हसल्याचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. पण, आजकालच्या धावपळीच्या आणि स्ट्रेसफुल रुटीनमध्ये कित्येकजण हसणचं विसरून गेले आहेत. त्यामुळे डॉक्टरही कायम आपल्याला हसत राहा, हसल्याने आयुष्य वाढते असे सांगत राहतात. गोड स्माइल द्या नाहीतर खळूखळून जोरात हसा, कसंही हसा त्याने फारसा फरक पडत नाही. पण, हसत राहा. हसल्याने मेंदू सेरोटोनिन, डोपामाइन, एंडोर्फिनसह आनंदी हार्मोन्स सोडतो. हे हार्मोन्स आपल्या वेदना कमी करतात आणि मन, शरीर शांत होते. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असुदेत खळखळून हसावे असं म्हणतात.

हसल्याने होतात फायदेच फायदे – 

  • हसल्याने स्ट्रेस कमी होतो, ज्यामुळे मेंदूमध्ये स्ट्रेस कमी करणारे हार्मोन्स तयार होतात. या हार्मोन्समुळे शरीराला आराम मिळतो आणि मन शांत होते.
  • हसल्याने हृदयाचा व्यायाम होतो. रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.
  • जेव्हा आपण हसतो तेव्हा शरीरातून रासयनिक द्रव्य एंडोर्फिन सोडले जाते. हे द्रव्य आपल्या हृदयाला आणखीनच मजबूत बनवते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • हसल्याने अतिरिक्त ऑक्सिजन निर्माण होतो. या ऑक्सिजनमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
    दररोज सकाळी हास्य ध्यान केल्याने दिवसभर फ्रेश वाटते.
  • रात्री झोपताना तु्म्ही जर हास्य ध्यान केले तर रात्री शांत झोप लागते.
  • हास्य योगामुळे शरीरात अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा स्त्राव होतो, ज्यामुळे डायबिटीस, पाठदुखीपासून आराम मिळतो.
  • हसल्याने कॅलरीज कमी होतात. तुम्ही जर एक तास दररोज हसलात तर 400 कॅलरीजचा वापर होतो, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
  • हसल्याने पोटाचे स्नायू ऍक्टिव्ह होतात, ज्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते आणि गॅस, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होत नाही.
  • हसल्याने आजुबाजूचे वातावरण सकारात्मक होते. तुमच्या खळखळून हसण्याने आजुबाजूचे हसतील आणि वातावरण हास्यमय होईल. अशा वातावरणात सर्वत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
  • हसल्याने मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो. ज्यामुळे मानसिक स्थिती सुधारते.त्यामुळे दररोज न चुकता निरोगी आरोग्यासाठी एक स्माइल द्यायला विसरू नका.

 

 

 

हेही पाहा –

Manini