Why Nath/Nose Pin Is Wore On Left Nostril : नाकात नथ आणि कपाळाला टिकली या भारतीय स्त्रीच्या पारंपरिक रूपाची भुरळ साऱ्या विश्वाला पडली आहे. मागील कित्येक वर्षात नथींच्या अनेक डिझाईन बाजारात आल्या. अलीकडे मोत्याच्याच नव्हे तर ऑक्सिडाइज किंवा चांदीच्या नथी किंवा नोजपिन सुद्धा वापरल्या जातात. पण खरं तर भारतीय संस्कृतीत कान आणि नाक टोचण्यामागे मोठी परंपरा आहे. तुम्हाला माहित आहे का तुमच्या डाव्या नाकपुडीवर नथ घातल्यास केवळ रूपातच नाहीतर आरोग्यातही मोठे बदल दिसून येऊ शकतात. नाक टोचण्यामध्ये धार्मिक आणि वैज्ञानिक कारण दोन्ही आहे. तर जाणून घेऊया नाक टोचण्याचे फायदे
नाकाची नथ घालण्याचे धार्मिक कारण
ज्योतिषशास्त्रानुसार नाकात नथ वैवाहिक जीवनात शक्ती प्रदान करते. विवाहित महिलेने शुभ प्रसंगी नाकात नथ घालणे शुभ लक्षण मानले जाते. हे केवळ विवाहित महिलांचे सौंदर्यच वाढवत नाही तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ज्योतिष शास्त्रात सोन्याची किंवा चांदीची नथ किंवा नोज रिंग घालणे शुभ मानले जाते.
नाकात नथ घालण्याचे वैज्ञानिक कारण
- असं मानलं जातं की नाकाचा डावा भाग महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित आहे. आयुर्वेदानुसार नाकपुडी उघडण्याच्या जवळ मज्जातंतूंचे पुंजके असतात जेव्हा नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र केले जाते तेव्हा या मज्जातंतू उत्तेजित होतात. ते मासिक पाळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं.
- तसेच मासिक पाळीच्या वेदना आणि प्रसूती वेदना देखील कमी करण्यात मदत होते.
- आपल्या शरीरात काही ऍक्युप्रेशर पॉईंट असतात, यापैकी डाव्या नाकावरील पॉईंट हा थेट प्रजनन प्रणालीशी जोडलेला असतो. डावी नाकपुडी टोचल्याने शरीरातील स्त्रीत्व खुलून येऊ शकते.
Edited By : Nikita Shinde