Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती पोळ्या कधीही मोजून का करू नये? काय आहे कारण...

पोळ्या कधीही मोजून का करू नये? काय आहे कारण…

Subscribe

आपल्याकडे अनेक कुटुंबांमध्ये घरातील व्यक्तींसाठी मोजून पोळ्या बनवल्या जातात. मात्र जेव्हा आपण मोजून पोळ्या बनवतो तेव्हा आपण मोजूनच त्या खातो. आजकालच्या वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे मोजून अन्न खाण्याची पद्धत जरी तुम्हाला चांगली वाटत असली तरी या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात याचे अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे तुमच्या कुंडलीवर देखील याचा वाईट परिणाम होतो, शिवाय या सवयींमुळे तुमच्या घरातील सुख, शांति आणि समृद्धीचा नाश होऊ शकतो.

जास्तीच्या पोळ्या बनवणे ठरू शकते फायदेशीर

- Advertisement -


हिंदू धर्मशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, कुटुंबातील व्यक्तींसाठी पोळ्या बनवताना कधीही त्या मोजून बनवू नये. नेहमी सगळ्यांसाठी पोळ्या बनवताना अधिक ३-४ जास्तीच्या बनवाव्या. शिवाय पहिली बनवलेली पोळी गायीला खाऊ घालावी. एक पोळी कुत्र्याला खाऊ घालावी. एक लहान पोळी कावळ्यासाठी ठेवावी. तसेच १-२ जास्तीच्या पोळ्या घराबाहेर आलेल्या एखाद्या गरजूसाठी ठेवावी.

हिंदू धर्मात या प्रकारचे दान करण्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. घरात कधीही अन्नाची कमतरता असू नये. ज्या घरातील व्यक्तींना अन्नाची दररोज अन्नाची कमतरता भासते. अशा ठिकाणी देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा वास करत नाहीत.

- Advertisement -

शिळ्या कणकेच्या पोळ्या बनवू नका

कधी कधी पीठ मळताना जास्तीची कणीक मळली जाते. अशावेळी ते अनेकजण फ्रिजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याची पोळी करतात. मात्र शिळ्या कणकेच्या पोळ्या तुमच्या शरिरासाठी घातक ठरू शकतात. शिवाय अशा पोळीमुळे तुमचे ग्रह देखील खराब होऊ शकतात.

 


हेही वाचा :http://World Milk Day 2022 : दुधासोबत ‘या’ 5 गोष्टींचे चुकून ही करू नका सेवन

- Advertisment -