Friday, February 7, 2025
HomeमानिनीNew Born Baby : नवजात बाळ का रडते?

New Born Baby : नवजात बाळ का रडते?

Subscribe

बाळाचा जन्म ही आई-वडीलांसाठी एक पर्वणीच असते. बाळाचा जन्म होताच आई-बाबासह संपूर्ण कुटूंब आनंदी होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद असतो. पण, नवजात बाळ मात्र रडत असते. नवजात बाळ जन्मल्यावर का रडते? याचा कधी विचार केला आहात का? डॉक्टरही बाळाच्या जन्माच्या 24 तासांच्या आत बाळाने रडणे आवश्यक आहे, असे सांगतात. चला तर मग जाणून घेऊयात, नवजात बाळ का रडते आणि त्याचे रडणे महत्त्वाचे का?

बाळाच्या जन्मानंतर बाळ रडणे महत्त्वाचे- 

जन्म झाल्यावर बाळाचे रडणे हे त्याच्या सुदृढ आयुष्याचे लक्षण मानले जाते. डॉक्टरांच्या मते, बाळ रडण्याने त्याचे हृदय आणि फुफ्फुसे उत्तम असल्याचे कळते. बाळ जेवढं मोठ्याने रडते तेवढं बाळ सृदुढ आणि निरोगी असल्याचे दर्शविते. जर बाळ जन्मताच रडलं नाही तर मात्र हा चितेंचा विषय ठरू शकतो. अशा बाळांना शारीरिक समस्या होण्याची शक्यता अधिक असते.

बाळ का रडते?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा ते अशा वातावरणात प्रवेश करते, ज्याचा त्याने यापूर्वी कधीही अनुभव घेतलेला नसतो. नवजात बाळाच्या शरीरारातील सिस्टीमला ऍक्टीव्ह होण्यासाठी ऑक्सिजन, पोषक आणि तापमान गरजेचे असते. त्यामुळ बाळाने रडणे ही व्यक्त होण्याचा एकमेव मार्ग असतो.

तुम्ही हे सुद्धा पाहिले असेलच की, लहान मुलं ही भूकेमुळे रडतात आणि दूध पिऊन शांत होतात. बाळ तीन महिन्याचे होईपर्यत त्याला दर तीन तासाला भूक लागते आणि हे सांगण्यासाठी ते रडते. डॉक्टरांच्या मते, नवजात बाळाला दिवसातून दोन ते तीन तास रडणे आवश्यक आहे.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini