मिठी मारणे प्रेम व्यक्त करण्याचे एक प्रकारचे माध्यम आहे. त्यामुळे खूप दिवसांनी जवळची व्यक्ती भेटली की तिला कडकडून मिठी मारली जाते. वाटायला अगदी सरळसाधी गोष्ट वाटत असली तरी एका मिठीचे अनेक फायदे आहेत. एक मिठी जादूपेक्षा कमी नाही आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. तरीही आपल्या आई-बाबाला, मुलांना मिठी मारायचे आपण विसरतो. इतकी जिवलग मंडळी आपल्या आसपास असतात पण आपण त्यांना दिवसातून किती वेळा मिठी मारतो? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एका मिठीमुळे जसे अनेक आजार दूर होतात त्याप्रमाणे नातेही घट्ट होते. एक मिठी तुमच्यातील आणि मुलांमधले नाते घट्ट करण्यासाठी फार उपयुक्त ठरू शकते. मुलांच्या मानसिक, भावनिक विकासात ही मिठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. चला तर मग जाणून घेऊयात, मुलांसाठी प्यार की झप्पी किती महत्वाची आहे.
- मुलांना मिठी मारल्यानंतर मुले सकारात्मकतेचा अनुभव घेतात. मुलांमध्ये सकारात्मकता वाढली की, मुले पॉझिटिव्ह विचार करतात, जे त्यांच्यासाठी उत्तम असते. यामुळे मुलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहते.
- मिठी मारणे हे आपल्या मुलांना त्यांच्या भावनांचे व्यवस्थापन कसे करावे आणि निरोगी मार्गाने कसे व्यक्त व्हावे हे शिकवते. त्यामुळे पालकांनी मुले मोठी होत आली तरी पालकांनी न चुकता त्यांना मिठी मारायला हवी. कारण लहान वाटणारी ही क्रिया मुलांच्या विकासात फार महत्त्वाची भूमिका निभावते.
- तुम्ही मुलांना जेव्हा एक प्रेमाची मिठी मारता तेव्हा मुले सुरक्षित आणि प्रेमाची भावना अनुभवतात. मुलांची वाढ होताना त्यांना सभोवताली सुरक्षित वाटणे फार महत्त्वाचे असते. ज्यामुळे मुले इमोशनली स्ट्रॉंग होतात.
- मिठी मारल्याने तुमच्यात आणि मुलांमध्ये एक प्रकारचे बॉंडिग तयार होते. यामुळे शारीरिक प्रेम वाढते आणि भावनिक बंध अधिक घट्ट होतो. मिठीमुळे एक मजबूत आणि विश्वासाचे नाते तयार होते.
- मिठी मारल्याने स्ट्रेस दूर होतो. खरं तर जेव्हा मिठी मारली जाते तेव्हा ऑक्सिटोसिन हार्मोन मेंदूत स्त्रवते. ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना दररोज एक तरी जादूची झप्पी द्यायला हवी.
- नियमित मिठी मारल्याने तुमच्यासाठी त्याचे महत्त्व आहे, ही भावना मुलांमध्ये वाढते.
- मुलांना मिठी मारल्याने मुलं खूश होतात. केवळ मुलंच नाही तर पालकही खूश होतात. यासह पालकांना ते मित्र समजू लागतात. अशावेळी मनातील कोणतीही गोष्ट पालकांसोबत शेअर करायला धजावत नाही, जे एकप्रकारे योग्यच आहे.
एकदरंच, पालकांनो मुलांच्या मानसिक, भावनिक विकासात महत्त्वाची असणारी मिठी दिवस कसाही गेला तरी आपल्या मुलांना मारायला विसरू नका.
हेही वाचा –