Sunday, March 16, 2025
HomeमानिनीHealthTamarind : आंबट-गोड चिंच आरोग्यासाठी गुणकारी

Tamarind : आंबट-गोड चिंच आरोग्यासाठी गुणकारी

Subscribe

लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वानाच चिंच खायला आवडते. चिंचेवर मीठ आणि लाल तिखट असेल तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. भारतीयांच्या जेवणात चिंच हमखास वापरली जाते. विशेष करुन मांसाहारी जेवणाचा बेत असेल तर चिंचेचा कोळ, चिंच चवीसाठी वापरतात. कोणत्याही पदार्थांत चिंच मिसळल्याने त्या पदार्थाची चव नक्कीच वाढते. चिंच केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर असते. चिंचमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी6, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटिन्स आदी पोषकतत्वे आढळतात. या पोषकतत्वांमुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चिंच खाल्ल्यामुळे आरोग्याला नक्की कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

चिंच खाण्याचे फायदे – 

  • पचनक्रिया सुधारण्याासाठी चिंच खावी. चिंचेतील टार्टेरिक ऍसिड पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. अन्नपचन सुरळीत झाल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटी यासारख्या समस्या जाणवत नाही.
  • चिंचेत पोटॅशियम असल्याने शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहतो
  • हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी चिंच खावी. चिंचेत ऍटी-ऑक्सिडंट असल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • ऍटी-ऑक्सिडंटसह चिंचेतील फ्लेव्होनॉइड्स आढळतात. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
  • चिंच व्हिटॅमिन सी युक्त असते. व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
  • चिंचेतील फायबरमुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते आणि तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन वाढत नाही.
  • चिंचेत ऍटी-ऑक्सिडंट असल्याने त्वचा निरोगी राहते. मुरूम, त्वचेवरील डाग अशा समस्या कमी होतात.
  • चिंचेत आयर्नची मात्रा भरपूर असते. त्यामुळे चिंच खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.
  • चिंच हायड्रोक्सिल ऍसिड युक्त असते. या ऍसिडमुळे शरीराची चरबी कमी होते.
  • वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन होते. यात घसादुखीची समस्या प्रामुख्याने होते. अशावेळी तुम्ही घसादुखीपासून आराम मिळण्यासाठी चिंचेच सूप प्यावे, नक्कीच आराम मिळतो.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini