कांद्याच्या फोडणीशिवाय भाजीला चव येत नाही असे कित्येक महिलांचे म्हणणे असते. त्यामुळे हमखास फोडणीसाठी कांद्याचा वापर केला जातो. फोडणीसाठी कांदा हवा म्हणजे तो बारीक चिरणे आवश्यक आहे. कांदा चिरताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागणे हे काय नवीन नाही. कांदा जितका खायला रुचकर असतो तितकाच चिरताना रडवतो. अशावेळी तुम्ही काही ट्रिक्स वापरायला हव्यात, जेणेकरून कांदा चिरताना तुम्हाला त्रास होणार नाही.
भाज्यांमधील कडवटपणा कमी करण्यासाठी मिठाचे पाणी कमी करतात. त्यामुळे कांदा चिरताना तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात 1 ते 2 चमचे मीठ मिक्स करून घ्या. काही वेळासाठी तयार मीठाच्या पाण्यात कांदा ठेवा. 15 ते 20 मिनिटानंतर कांदा चिरून घ्या. या ट्रिकमुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही.
वापरा या ट्रिक्स –
- तुम्ही कांदा चिरण्याआधी काही वेळासाठी कांदे थंड पाण्यात ठेवावी. यासाठी बर्फाचे पाणी वापरणे जास्त प्रभावी ठरेल.
- कांदा चिरताना लिंबाच्या पाण्याचा वापर करणे उत्तम ठरेल. यासाठी एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस, अर्धा कप पाणी आणि एक चमचा व्हिनेगर मिक्स करून घ्या.या पाण्यात कांदा 15 मिनिटांसाठी ठेवून द्या. यानंतर कांदा चिरावा. या ट्रिकमुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही.
- कांदा चिरताना गॉगलचा वापर करायला हवा. पण, गॉगल असा वापरावा ज्यातून थोडी सुद्धा हवा डोळ्यांपर्यत पोहोचणार नाही.
- कांदा चिरताना धारदार चाकूचा वापर करावा. अशा चाकूने कांदा कापल्याने कांद्याचा थर कापला जाईल आणि कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडतील. परिणामी, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही.
कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येतं ?
कांद्यामध्ये सायन- प्रोपॅनिथियल एस ऑक्साइड नावाचे केमिकल असते. या केमिकलमुळे डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागतात. याशिवाय कांद्यामध्ये लेक्राअमेट्री फॅक्टर सिथेंस एन्जाइम्स असते. कांदा चिरताना हेच केमिकल बाहेर येते, त्यामुळे डोळ्यांच्या लेक्राइमल ग्लॅडवर परिणाम होण्यास सुरूवात होते. परिणामी, डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde